MI VS PBKS : मुंबईच्या पराभवाला कोण जबाबदार? जाणून घ्या हार्दिक पंड्याने कुणावर फोडले खापर
MI vs PBKS who won yesterdays match : आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्ज (PBKS) ने मुंबई इंडियन्स (MI) चा 5 विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात आधी पावसाने व्यत्यय आणला होता, मात्र त्यानंतर हा सामना मध्यरात्री पुर्ण झाला.
या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याने कर्णधाराला साजेसी खेळी करत हार्दिक पांड्याच्या मुंबई संघाला घरचा रस्ता दाखवला. या सामन्यात मुंबईला मोठी विजयाची संधी होती, पण निर्णायक क्षणी चुका आणि सोडलेले झेल आणि फिल्डिंग हेही पराभवाला कारणीभूत ठरले असे असले तरीही मुंबई इंडियन्सच्या पराभवाला कोण जबाबदार आहे या प्रश्नाचे उत्तर उघड आहे.

मुंबईच्या पराभवाची जबाबदार कोण?
मुंबई संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने पत्रकार परिषदेत संघाच्या पराभवासाठी स्वतःवर दोषारोप घेतला आहे, यासह त्याचा रोख जसप्रित बुमराहकडेही होता हे त्याच्या विधानातून जाणवते.
मुंबईची धावसंख्या चांगली पण गोलंदाजांनी खाल्ला मार!
मुंबई संघाच्या फलंदाजांनी उत्तम धावसंख्या या सामन्यात उभारली पण गोलंदाजी निराशाजनक कामगिरी केली. या पावसाने प्रभावित सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 203 धावा केल्या. सूर्यकुमार यादव (44), तिलक वर्मा (44) आणि नमन धीर (37 धावा) यांनी संघाला मजबूत धावसंख्या गाठून दिली. मुंबईने खेळावर ताबा मिळवला आहे असे वाटत होते, पण गोलंदाजीत तीक्ष्णता नसल्यास 200+ चे लक्ष पंजाबने सहज गाठले.
श्रेयस अय्यर धुवांधार खेळला अन् मुंबईचा खेळ संपला
204 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात डळमळीत झाली, पण नंतर श्रेयस अय्यर 41 चेंडूत नाबाद 87 धावा केल्या. आणि नेहल वधेरा 48 धावांच्या साथीने डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनी 84 धावांची भागीदारी केली आणि मधल्या षटकांमध्ये मुंबईचे सर्व नियोजन अपयशी ठरले. बुमराहला लक्ष्य करण्यात आले आणि पॉवरप्ले दरम्यान शेवटच्या षटकात जोश इंग्लिसने पंड्याच्या एका षटकात 20 धावा दिल्या. बुमराहसारख्या गोलंदाजाने चार षटकात 40 धावा देणे हा या पराभवाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला.
हार्दिक पंड्या काय म्हणाला?
हार्दिक पांड्याने पराभवाचे खापर स्वःतवरच फोडत दोषही स्वतःवर घेतला, पण त्याचा रोख बुमराहकडे होता असे दिसून आले. पंड्यासाठी हा कठीण काळ होता, त्याने सामन्यानंतर कबूल केले की तो कर्णधार म्हणून अधिक काही करू शकला असता. तो म्हणाला, 'मी याची जबाबदारी घेतो. विशेषतः श्रेयसने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्याने संधी घेतल्या आणि उत्कृष्ट खेळ केला.
बुमराहकडून आज तसे झाले नाही..
' पंड्या पुढे म्हणाला, 'आमचा स्कोअर बरोबरीचा होता, परंतु तो वाचवण्यासाठी गोलंदाजी युनिटकडून जबरदस्त कामगिरीची आवश्यकता होती. पण ते (पंजाबचे फलंदाज) खूप शांत होते, त्यांनी आमच्यावर दबाव आणला आणि आम्ही नियोजन केल्याप्रमाणे कामगिरी करू शकलो नाही.' हार्दिक पंड्या म्हणाला की आम्ही चांगली गोलंदाजी करू शकलो असतो. जर आम्ही योग्य वेळी योग्य गोलंदाज आणला असता तर निकाल वेगळा असता. पंड्याला जेव्हा विचारण्यात आले की जसप्रीत बुमराहला 16 व्या षटकात आणायला हवे होते का, तेव्हा तो म्हणाला की बुमराहला सर्व काही माहित आहे. जर 18 चेंडू असते तर बुमराहने काहीतरी खास केले असते, परंतु आज तसे झाले नाही.












Click it and Unblock the Notifications