Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारत विरुद्ध न्यूझीलंडचा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर ट्रॉफी कोणाला मिळेल? घ्या जाणून

India vs New Zealand Final: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्याची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. या अंतिम सामन्यात भारत विरुध्द न्युझीलंड यांच्यात लढत होणार आहे. हा सामना 9 मार्च रोजी दुबई येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघ तिस-यांदा जेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरेल तर न्यूझीलंडला दुसरे जेतेपद जिंकायचे आहे, पण जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर? अशा परिस्थितीत कोणत्या संघाला विजेता घोषित केले जाईल?

दरम्यान न्यूझीलंडच्या संघाने शेवटचे 2000 मध्ये विजेतेपद जिंकले होते. दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म पाहता सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे. 2019 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात न्यूझीलंडला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता, जिथे त्यांनी सामना बरोबरीत सोडवला परंतु चौकारांच्या संख्येवर इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता.

ind vs NZ

IND vs NZ: जर सामना अनिर्णित राहिला तर विजयी संघ कसा ठरवला जाईल?

जर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत सामना बरोबरीत सुटला तर विजेता सुपर ओव्हरद्वारे ठरवला जाईल. जर सुपर ओव्हर देखील बरोबरीत सुटली तर एक संघ जिंकेपर्यंत पुढील सुपर ओव्हर्स खेळवल्या जातील.

IND vs NZ: पावसामुळे अंतिम सामना रद्द झाला तर काय होईल?

स्पर्धेदरम्यान पाकिस्तानमध्ये पावसामुळे तीन सामन्यांना अडचणीचा सामना करावा लागला आहे. परंतु हा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल, जिथे पावसाची शक्यता कमी आहे.

IND vs NZ: राखीव दिवशीही सामना रद्द झाला तर काय होईल?

जरी पावसामुळे अंतिम सामना रद्द झाला तरी सामना राखीव दिवशी म्हणजेच 10 मार्च रोजी खेळवला जाईल आणि जर दुसऱ्या दिवशीही पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना ट्रॉफी वाटून दिली जाईल. 2002 मध्ये पावसामुळे भारत आणि श्रीलंकेने ट्रॉफी वाटून घेतली होती तेव्हा असे एकदा घडले होते.

सलग सात एकदिवसीय सामने जिंकल्यानंतर गट अ मध्ये न्यूझीलंडवर विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार फलंदाजी दाखवली तर त्यांना भारताच्या फिरकी गोलंदाजांचा प्रभावीपणे सामना करावा लागला.

न्युझीलंडच्या संघासाठी वरुण चक्रवर्ती ठरणार डोकेदुखी

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती न्यूझीलंडसाठी मोठे आव्हान निर्माण करत आहे. त्याने गेल्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आहेत. पण पुन्हा एकदा तो अंतिम सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. या महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडच्या यशासाठी त्यांना फिरकी गोलंदाजांना हाताळणे महत्त्वाचे ठरेल.

भारत आणखी एक विजेतेपद जिंकेल की दोन दशकांनंतर न्यूझीलंड पुन्हा एकदाविजेतेपद याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे, ज्यामुळे ही अंतिम लढत जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी एक अटीतटीची स्पर्धा बनली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+