IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा
Ind vs nz t20 final jasprit bumrah 4 wickets : फलंदाजांनी रचलेल्या २५५ धावांच्या हिमालयाला पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाला भारतीय गोलंदाजांनी साधी डोके वर काढण्याची संधीही दिली नाही. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजी आक्रमणाने न्यूझीलंडचा डाव अवघ्या १९ षटकांत १५९ धावांत गुंडाळला. भारताच्या या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे किवी फलंदाजांनी गुडघे टेकले.
खास बाब म्हणजे "धावांचा डोंगर उभा असतानाही बुमराहने किवींना साधी धावही चोरू दिली नाही! जसप्रीत बुमराहचा भेदक स्पेल (४/१५) आणि अक्षर पटेलच्या निर्णायक धक्क्यांनी भारताचा ऐतिहासिक ९६ धावांनी विजय निश्चित केला. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचं स्वप्न.. कसं विखुरल हे आपण जाणून घेऊया.

बुमराहचा 'स्पेल ऑफ द मॅच': ४ षटकात १५ धावा, ४ बळी!
जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा टीम इंडियाचा हुकुमी एक्का ठरला. त्याने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात अवघ्या १५ धावा देऊन न्यूझीलंडचे ४ महत्त्वाचे बळी घेतले. त्याची सरासरी (ECON) अवघी ३.७५ होती, ज्यावरून त्याच्या माऱ्याची धार स्पष्ट होते. बुमराहने मिचेल सँटनर, जेम्स नीशम, मॅट हेनरी आणि रचिन रवींद्र यांना बाद करून न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा पूर्णपणे संपुष्टात आणल्या.
अक्षर पटेल आणि हार्दिकचा निर्णायक प्रहार
पॉवरप्लेमध्ये आणि मधल्या षटकांत अक्षर पटेलने ३ षटकात २७ धावा देत ३ बळी टिपले. त्याने फिन ऍलन, ग्लेन फिलिप्स आणि धोकादायक डॅरिल मिचेल यांना बाद करून न्यूझीलंडची भागीदारी जमू दिली नाही. तर कर्णधार हार्दिक पांड्याने ४ षटकात ३६ धावा देत १ बळी घेतला, पण त्याने मधल्या षटकांत धावगतीवर पूर्णपणे अंकुश ठेवला.
किंवींचा डाव १५९ धावांवर आटोपला
न्यूझीलंडकडून केवळ डॅरिल मिचेल (१७ चेंडूत ४३), मिचेल सँटनर (३५ चेंडूत ४३) आणि फिन ऍलन (१३ चेंडूत ९७) यांनी काही काळ संघर्ष केला. मात्र, संजू सॅमसन, इशान किशन आणि तिलक वर्मा यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे न्यूझीलंडने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांनीही १-१ बळी घेत विजयात खारीचा वाटा उचलला.
हेही वाचा : ND vs NZ संजू-अभिषेकचं 'अग्नितांडव'; इशानची साथ! पाॅवर-प्लेमध्येच 'किवी'चा खेळ खल्लास कसा झाला? वाचा
हेही वाचा : IND vs ENG: हारता हारता जिंकला भारत! मॅजिक ओव्हर, 6 बॉलमध्येच इंग्लंडचा गेम; 'हा' खेळाडू ठरला हिरो












Click it and Unblock the Notifications