ND vs NZ संजू-अभिषेकचं 'अग्नितांडव'; इशानची साथ! पाॅवर-प्लेमध्येच 'किवी'चा खेळ खल्लास कसा झाला? वाचा
Ind vs nz final sanju samson abhishek sharma ishan kishan batting : टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या फायनलमध्ये भारतीय फलंदाजांनी केवळ धावा केल्या नाहीत, तर न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा आत्मविश्वासच मोडीत काढला. संजू सॅमसनची क्लासिक फटकेबाजी, अभिषेक शर्माचा वेगवान तडाखा आणि इशान किशनची संयमी पण आक्रमक भागीदारी यामुळे भारताने फायनलच्या इतिहासातील सर्वोच्च २५५/५ अशी धावसंख्या उभी केली.
याचमुळे "न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी झाली! संजू सॅमसनने त्यांना दाखवला क्लास, तर अभिषेक शर्माने ऐतिहासिक वेगवान धमाका केला. इशान किशनच्या साथीने भारताने २५५ धावांचा हिमालय उभारला. खास म्हणजे यात शिवम् दुबेनेही छान योगदान दिले. जाणून घेऊया, टीम इंडियाच्या फलंदाजीचे संपूर्ण विश्लेषण..."

सामन्याची सुरुवात होताच अभिषेक शर्माने आपल्या नावाला साजेसा खेळ केला. अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक ठोकत त्याने या स्पर्धेतील सर्वात वेगवान ५० धावांचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा उठवत मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. अभिषेकने एकूण १९ चेंडूत ५२ धावा केल्या, ज्यामुळे भारताला पहिल्या ६ षटकांतच ९२ धावांपर्यंत मजल मारता आली.
संजू सॅमसन: संयम आणि संहाराचे अनोखे मिश्रण
अभिषेक बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने डावाची धुरा सांभाळली. संजूने ४६ चेंडूत ८९ धावांची मॅरेथॉन खेळी खेळली. यात त्याने ५ नेत्रदीपक चौकार आणि ८ गगनभेदी षटकार खेचले. संजूची फलंदाजी पाहून जगातील दिग्गज क्रिकेटपटूंनीही त्याला दाद दिली. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल त्याला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' हा किताब देऊन गौरवण्यात आले.
इशान किशनची निर्णायक भागीदारी
मधल्या षटकांत जेव्हा न्यूझीलंडने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इशान किशन संजूच्या सोबतीला धावून आला. इशानने केवळ खेळपट्टीवर तग धरला नाही, तर संजूला स्ट्राईक रोटेट करून मोठा स्कोअर करण्यास मदत केली. संजू आणि इशान यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी मोक्याच्या क्षणी ७४ धावांची जलद भागीदारी झाली.
इशान किशनने २४ चेंडूत ३८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, ज्यामध्ये ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या भागीदारीमुळे भारताची धावसंख्या २०० च्या पार जाणे सुसह्य झाले.
हेही वाचा : संजूच्या संघर्षात क्रिकेटचा देव धावून आला! सचिनचा काॅल अन् मैदानात षटकारांचा पाऊस वाचा 'तो' किस्सा
हेही वाचा : Sanju samson : संजू सॅमसनमुळे भारत सेमीफायनलमध्ये! संजू का आहे खास? जाणून घ्या त्याची कारकीर्द












Click it and Unblock the Notifications