बाबा सिद्दीकींना 15दिवसांपुर्वी धमकी! Y सुरक्षा असुनही हत्या! कायदा सुव्यवस्था कोलमडली - राहुल गांधी
Baba Siddique : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्रे येथील निर्मल नगरजवळ गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यावेळीच मृत्यू झाला. आज त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कूपर रुग्णालयात हलवण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे बाबा सिद्दीकींना पंधराच दिवसांपुर्वी ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर त्यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. त्यांना वाय सुरक्षा देण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांच्या पंधरा दिवसांपूर्वीच जीवाला धोका निर्माण झाला होता. शनिवारी रात्री महाराष्ट्राच्या माजी मंत्र्यावर त्यांचा आमदार मुलगा जीशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर वांद्रे पूर्वेतील निर्मल नगर येथील कोलगेट मैदानाजवळ गोळ्या झाडण्यात आल्या. हल्ल्यानंतर काही वेळातच बाबा सिद्दीक यांचा लीलावती हॉस्पिटलमध्ये गोळी लागून मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकीच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानंतर त्याची सुरक्षा Y श्रेणीत वाढवण्यात आली होती. दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली असली तरी एक अद्याप फरार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
वाय श्रेणी असूनही हत्या..!- विरोधक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करुन त्यांना 'वाय' श्रेणी सुरक्षा कवच देण्यात आले होते असे बोलले जात आहे. या राजकीय नेत्याला सरकार संरक्षण देऊ शकत नसेल तर सामान्य जनतेचे संरक्षण कसे करणार असा सवाल विरोधकांनी केला आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
महाराष्ट्रात कायदा सुव्यस्था कोलमडली - राहुल गांधी
राहुल गांधी यांनी ट्वीट केलं की, "बाबा सिद्दीकी जी यांचे दुःखद निधन धक्कादायक आणि दुःखदायक आहे. या कठीण काळात मी त्यांच्या कुटुंबासोबत आहे. या भयावह घटनेनं महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे आणि न्यायाचा विजय झाला पाहिजे."
The tragic demise of Baba Siddique ji is shocking and saddening. My thoughts are with his family in this difficult time.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 13, 2024
This horrifying incident exposes the complete collapse of law and order in Maharashtra. The government must take responsibility, and justice must prevail.
काय म्हणाले काँग्रेस नेते वेणूगोपाल?
बाबा सिद्दीकी यांच्या खुनामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असून महाराष्ट्रात आधी विविध घटना घडल्या आहेत. यातच ही घटना म्हणजे महाराष्ट्रातील ढासळत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्था असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांनी केला आहे.
सिद्दीकी यांनी अनेक वेळा अधिकाऱ्यांना त्यांच्या जीवाला असलेल्या धोक्यांची माहिती दिली होती आणि वाय प्लस सुरक्षेत असतानाही त्यांना त्रास सहन करावा लागला. गजबजलेल्या बाजारपेठांच्या मधोमध हे गोळीबार रस्त्यावर घडले, हे दाखवते की महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही," असे ही वेणुगोपाल म्हणाले.
प्रियंका चतुर्वेदींची संतप्त प्रतिक्रीया..
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वैदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबद्दल संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "बाबा सिद्दीकी यांची हत्या ही अतिशय संतापजनक घटना आहे. तीन वेळा आमदार राहिलेले आणि वाय सिक्युरिटी असलेल्या बाबा सिद्दीकीची मुंबईतील वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था आहे का? एखाद्या ओळखीच्या व्यक्तीसोबत असे घडले तर कसे? सामान्य लोक स्वतःला सुरक्षित समजू शकतात का?"












Click it and Unblock the Notifications