Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव का झाला; वाचा पराभवाचे सखोल विश्लेषण

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सर्वात मोठा झटका बसला तो महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला. लोकसभा निवडणुकीत तब्बल तेरा खासदार निवडून आणून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत पूर्ण धुवा उडाला. अवघे 16 आमदार निवडून आणण्यात पक्षाला यश आले यामागे संघटनेतील विसंवाद आणि सावळा गोंधळ कारणीभूत असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.

या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला. 1990 सालापासून अपराजित असलेले काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार बाळासाहेब थोरात, अमरावती जिल्ह्यातील वजनदार नेत्या यशोमती ठाकूर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. तर मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले थोडक्यात बसवले आहेत. राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासारखे स्टार प्रचारक घेऊनही काँग्रेसची दुर्दशा झाली.

Maharashtra Assembly Election 2024

निवडणुका जाहीर झाल्यापासून काँग्रेस आणि महाविकास आघाडीत कोणताही समन्वय नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. लोकसभेत 13 जागा निवडून आल्यामुळे पक्षाचे नेते हवेत होते. आपणच मोठा भाऊ आहोत या थाटात काँग्रेसने सहकारी पक्षांना कस्पटा समान वागवले. खुद्द काँग्रेस अंतर्गतच प्रचंड विसंवाद असल्याचे दिसून आले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या जबाबदारीचे पालन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. आपली सत्ता येणार या भ्रमात असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षम्य चुका करून ठेवल्या.आणि त्याचे परिणाम सर्वत्र दिसून आले.

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आला दिलेला पाठिंबा सुशील कुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अचानक काढून घेतला. त्यामुळे महायुती बेबनाव असल्याचा संदेश संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पोहोचला. काँग्रेस एकदिलाने लढते आहे, असे कुठेही जाणवले नाही. पक्षाचा प्रत्येक नेता आपापल्या मतदारसंघात आपापली लढाई लढण्यात मश्गुल होता. संघटना किंवा पक्ष म्हणून आपल्याला लढायचे आहे, हे भानच कुणाला नव्हते. विकास आघाडी म्हणून जिंकून आणण्याची सर्वस्वी जबाबदारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरच असल्याचा काँग्रेसचा पवित्रा होता.

अमित देशमुख, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे, गोवाल पाडवी या तरुण नेत्यांनी पक्षासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील गट अलिप्त राहिला. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर उत्तर मतदारसंघावरून झालेले राजकारण आणि उमेदवारांनी घेतलेली माघार चर्चेचा विषय ठरली. तिथे उमेदवार मधुरिमा राजे, खासदार शाहू महाराज आणि स्थानिक नेते सतेज पाटील यांच्यातील विसंवाद जिल्हाभरात चर्चिला गेला. कोल्हापुरातील गोंधळाचे परिणाम संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर झाले.

मैदानावरचे प्रश्न वेगळे असताना राहुल गांधी पुन्हा संविधान आणि अदानीचा मुद्द्यावरच घुटमळत राहिले. त्याचा निवडणुकीचा वातावरणावर कोणताही परिणाम झाला नाही. कार्यकर्त्यांना चार्ज करण्यात स्थानिक नेते कमी पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले. आणि बहुरंगी लढती देखील काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+