आ. सुरेश धसांचा यू-टर्न; कालपर्यंत वक्तव्यावर ठाम, आज प्राजक्ता माळींची मागितली माफी
जे होईल ते होईल... असं म्हणणारे आ. सुरेश धस आज अचानक बदलले. अभिनेत्री प्राजक्ता माळीची माफी मागत त्यांनी हा विषय संपवला. माझ्या वाक्याचा गैरअर्थ काढण्यात आला. मला प्राजक्ताताई किंवा इतर कोणत्याही महिलेबद्दल आदरच आहे. मी जर कुणाचे मन दुखावले असेल, तर मी दिलगीरी व्यक्त करतो असं म्हणत आ. सुरेश धसांनी हा विषय संपवला.

काय म्हणाले सुरेश धस?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आ. सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांची माफी मागितली. ते म्हणाले, 'प्राजक्ताताई माळी यांच्या संदर्भात मी केलेल्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबत बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता. मी प्राजक्ताताई आणि समस्त स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या विधानाने जर त्यांचे किंवा कुणाचेही मन दुखावले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं सुरेश धस यांनी म्हटलं.
काय होता नेमका वाद?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडमधील आका व आकाचा बाँस या दोन कॅरेक्टरबाबत सुरेश धस पहिल्यापासून आक्रमक होते. त्यांनी तो मुद्दा थेट अधिवेशनात मांडला होता. त्यानंतर वेळोवेळी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एकदा अभिनेत्री प्राजक्ता माळी व इतर दोन अभिनेत्रींची नावे घेतली होती. इव्हेंट मॅनेजमेंट पाँलिटिक्स शिकायचं असेल तर परळी पॅटर्नचा आभ्यास करायला हवा असं म्हणत त्यांनी प्राजक्ता माळी आणि परळीचं कनेक्शन सांगितलं होतं. मात्र त्यांच्या या विधानानंतर चांगलाच वाद पेटला. स्वतः अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेत, घाणेरड्या राजकारणासाठी स्त्रियांचा वापर होत असल्याचा आरोप आ. धसांवर केला होता.
माळींची मुखमंत्र्यांशी भेट
सुरेश धस यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषदेत केली होती. शिवाय याच संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. कालपर्यंत जे होईल ते होईल... असं देखील त्यांनी म्हटलं होतं. अखेर आता सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांची माफी मागितली आहे. मी प्राजक्ताताई आणि समस्त स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या विधानाने जर त्यांचे किंवा कुणाचेही मन दुखावले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications