बाळासाहेबांना भारतरत्न द्या; जयंतीदिनी ठाकरे गटाची मोठी मागणी
अमित शहा व नरेंद्र मोदींना शिवसेनेतर्फे आवाहन आहे की, तुम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या. तुम्ही तो दिला, तरच तुम्ही खरे... अशी मागणी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केली. बाळासाहेबांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आज त्यांना शिवसेना ठाकरे गटातर्फे अभिवादन करण्यात आले. त्या कार्यक्रमात राऊत यांनी हे वक्तव्य केलं.

काय म्हणाले राऊत
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राऊत म्हणाले की, "शिवसेनेचे दोन गट वेगवेगळ्या सभा घेताहेत. जे खरोखर बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, त्यांना एक गोष्ट समजली पाहिजे, माननीय शिवसेनाप्रमुखांनी उभ्या आयुष्यात वेगळा गट निर्माण केला नाही. त्यामुळे गट हा शब्द चुकीचा आहे. जिथे मातोश्री आहे, तिथे शिवसेना आहे. बाजारात डुप्लीकेट औषध असतात, कपडे असतात, असा शिवसेनेच्या नावाने चायना माल बाजारात आला असेल तर तो तात्पुरता असतो. अशा गोष्टी भाजपाकडून निर्माण झाल्या आहेत. भाजपा स्वत: चिनी माल आहे. म्हणून ते राजकारणात चिनी मालाचा पुरवठा करत असतात." अशा शब्दांत राऊतांनी भाजप व शिंदे गटावर हल्ला चढवला.
खरी शिवसेना मातोश्रीत
नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्याच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, "नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेसमोर प्रतिकूल परिस्थिती परिस्थिती निर्माण केली आहे. त्या प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत आम्ही उभे आहोत. ती बाळासाहेबांची प्रेरणा आहे. महाराष्ट्रात येऊन मतांसाठी नाव घेतलं म्हणून ती बाळासाहेबांची प्रेरणा ठरत नाही.
भारतरत्नची मागणी
राऊत म्हणाले की, "अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना शिवसेनेतर्फे आवाहन आहे, हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा 'भारतरत्न' पुरस्काराने गौरव करा. ही शिवसेनेची मागणी आहे, तर तुम्ही खरे. हिंदू ह्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार मिळायलाच पाहिजे. कालपासून शिवसेनेच्या ज्या संस्था आणि संघटना आहे. हिंदूंच्या संघटना आहेत, त्यांनी भारत रत्नासाठीचे ठराव मंजूर केले आहेत. 12 वर्षात ही मागणी कधी झाली नव्हती. पण आमच्या सर्व खासदारांनी संसदेत ही मागणी संसद आणि संसदेबाहेर केली आहे. विधीमंडळात केली आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
भारतरत्नवर राजकारण
राऊत यांनी भाजप सरकारवही निशाणा साधला. ते म्हणाले, गेल्या 12 वर्षात मोदी सरकारने मतांसाठी आणि राजकीय गणितासाठी भारतरत्न दिले. नाव घेऊन कुणाचा अपमान करायचा नाही. पण ज्यांची राज्यात ताकद नाही, ज्यांना कोणी ओळखत नाही अशा लोकांना मोदींना भारत रत्न दिला. आम्ही त्यांचाही सन्मान करतो. पण बाळासाहेबांनी हिंदूंना अस्मिता दिली. त्यामुळेच राम मंदिर उभं राहिलं. त्यामुळे बाळासाहेबांना भारत रत्न द्या. मोदी आणि शाह यांनी ट्विटरवर आदरांजली अर्पण केली. त्यांनी आदरांजली अर्पण करण्याऐवजी त्याच ट्विटरवर शिवसेना प्रमुखांना भारत रत्न दिल्याचं जाहीर करावं, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications