महायुतीचे तीन घटकपक्ष रोज सकाळी सागर बंगल्यावर जिलेब्या खायला बसतात का? - संजय राऊतांचा जोरदार टोला
Sanjay Raut's Criticism of mahayuti : "शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही. सत्ताधारी म्हणत असतील की आमच्यात वाद आहे तर महायुतीचे तीन घटक पक्ष रोज सकाळी सागर बंगल्यावर जिलेब्या खायला बसतात का.."असा जळजळीत सवाल राऊत यांनी व्यक्त केला. एका अर्थाने महायुतीचेही जागावाटप सुरुळीत सुरु नाही हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते.
संजय राऊत आज 23 ऑक्टोबरला सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलत होते. काल जी यादी आली त्यात चुका आहेत त्या दुरुस्त होणार आहे. आमच्यात एकमत झाले काही गोष्टीत एकमत आज संध्याकाळपर्यंत होईल. आमच्यातील छोट्या-छोट्या पक्षांना आज जागा मिळतील असेही ते यावेळी म्हणाले.

अजून काही ओव्हर खेळायच्या शतक ठोकू
संजय राऊत म्हणाले, आता फार घोळ घालून चालणार नाही. सांगोल्याच्या जागेवर चर्चा सुरु आहे. सांगोल्यात शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. परंडामध्येही शिवसेना जिंकून आली आहे. अजून काही ओव्हर खेळायच्या शिल्लक आहेत. आज आम्ही 85 पर्यंत आलो आहोत.
तिसऱ्या आघाडीवर वक्तव्य
संजय राऊत म्हणाले, आघाडी, महायुतीत तीन प्रमुख पक्ष असल्यावर आपापल्या भूमिका मांडल्या जातात याचा अर्थ टोकाचे मतभेद असतातअसे नाही. काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद काल झाली. महाराष्ट्रात तीन आघाड्या आहेत तिथेही जागा वाटप सुरुळीत पार पडणार नाही.
उमेदवारी न मिळालेल्यांचा सरकार आल्यावर विचार
संजय राऊत म्हणाले, कुणाला जागा द्यायचे हा पक्षाचा प्रश्न आहे. जिंकण्याची क्षमता हे गृहीत धरुन उमेदवाऱ्या दिल्या जात आहे पण ज्याला तिकीट दिले नाही ते काहीही बोलू शकतात पण त्यांनी थोडं विचारपुर्क बोलायला हवे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांच्याविषयी मला वेदना आहेत कारण कार्यकर्ते पाच वर्ष काम करतात. स्पर्धेत कुणी मागे पडते हे दुर्दैव आहे पण त्यामुळे उमेदवारी न दिलेल्या इच्छुकांच्या कार्यकर्त्यांकडे लक्ष नाही असे नाही. अशा अनेक मतदारसंघात डावललेले उमेदवारांची सरकार आल्यावर भरपाई केली जाईल.
महाराष्ट्रद्रोह्यांना मदत करु नका
संजय राऊत म्हणाले, एखाद-दुसरा अपवाद वगळता आंपसात जागेंत बदल होऊ शकतात. महाराष्ट्रात निवडणूक महायु्द्धासारखी लढली जाईल पण महाराष्ट्रद्रोह्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोण मदत करतेय हे बघावे लागेल. अमित शहा आणि मोदींना महाराष्ट्र गिळता यावा यासाठी कुणी मदत करत नाही ना..हे जनता पाहत आहे. शिवसेना महाराष्ट्रद्रोह्यांना मदत करत नाही. या लढाईत जे आमच्यासोबत ते महाराष्ट्राचे.












Click it and Unblock the Notifications