जयदीप आपटेच्या जामिनासाठी आठ दिवसांपासून प्रयत्न, ख-या सुत्रधारावर कारवाई कधी? संजय राउतांचा सवाल
मुंबई : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा केवळ आठच महिन्यात कोसळला. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे.
या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील दोघे मुख्य आरोपी आहेत. चेतन पाटीलला काही दिवसांपूर्वी अटक झाली. पण जयदीप आपटेला फरार होता, काल रात्री पोलिसांनी कल्याण अटक केली. मात्र शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी जयदीप आपटेबाबत गंभीर आरोप केले आहेत.
मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत यांनी सांगितले की, जयदीप आपटेच्या पाठीशी महाशक्ती असल्याने तो इतके दिवस पोलिसांना चुकवू शकला. पण शिवभक्तांचा दबाव आणि रेटा एवढा होता की, आपटेचे बॉसही त्याला वाचवू शकले नाहीत. जयदीप आपटे दोन दिवसांत सरेंडर होईल त्यांच्या जामिनाची ताबडतोब व्यवस्था करा, असे आदेश देण्यात आले होते, जयदीप आपटे याला लागणारी कायदेशीर मदतही ठाण्यातून पुरवली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यात हा बाजार मांडला आहे आणि जे षडयंत्र रचण्यात आले आहे, त्याचे सर्व सूत्रधार ठाण्यातच आहेत आपटेला देणारे सूत्रधार सरकारमध्येच आहेत. या सूत्रधारांवर कारवाई कधी होणार असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
ते कोर्टालाही 1500 रुपये पाठवतील
संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना शिंदे सरकारवर निशाणा साधला, राज्यातील हे सरकार 1500 च्यावर जाणार नाही. स्वत 15 हजार कोटी ठेवतील. पण बहिणींना 1500, कर्मचाऱ्यांना 1500 देतील. त्यांचं 1500 चं लिमिट आहे. त्यांचा एक पेग 1500 चा आहे. त्याच्यावर ते जाणार नाही. आमच्याकडून कुणी कोर्टात गेलं नाही. कोर्ट त्यांच्या बाजूने आहे. ते कोर्टालाही 1500 पाठवतील, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
आदिवासींना मृतदेह खांद्यावर घेऊन जावं लागत आहे
मुख्यमंत्री गडचिरोलीचा कायापालट करणार असं सांगत होते. आदिवासी आणि गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करण्यापेक्षा या ठिकाणी खाण उद्योग आहे. त्याचा आर्थिक व्यवहार आपल्याला हातात राहावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी जिल्हा जवळ ठेवला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी नेमले आहेत. आदिवासींचा विकास नाही. तर आदिवासींना मृतदेह खांद्यावर घेऊन जावं लागत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.












Click it and Unblock the Notifications