Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पटोलेंवर व्यक्तिगत बोललो नाही, तेवढा संस्कृतपणा आमच्यात; संजय राऊतांवर अशी म्हणण्याची का आली वेळ?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे जागावाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचे म्हटले होते. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही थेट पत्रकार परिषदेतूनच पलटवार केला. संजय राऊत हे त्यांच्या पक्षश्रेष्ठींचं म्हणजेच उद्धव ठाकरेंचं ऐकत नसतील तर हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊतांबद्दलची नाराजी उघड केली. त्यामुळे नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळले. आता संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस आणि आमची जागा वाटपाबद्दलची चर्चा थांबलेली नाही. काल दिवसभर शरद पवार यांच्या नेतृत्वात आमची चर्चा सुरू होती. जयंत पाटीलांसह आम्ही चर्चा केली यात अनेक प्रश्न सुटले. एकत्रीत गुता सोडवण्याची मानसिकता लागते ती आमच्या दोघांमध्ये आहे, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut  Nana Patole

चेथलिया मातोश्रीवर जाणार

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला मातोश्रीवर येत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. अनेक जागांवरील तिढा आम्ही सोडवलेला आहे. यात राष्ट्रवादी आणि आमच्या बऱ्याच गोष्टी मोकळ्या झाल्या.

पटोलेंबद्दल मी काहीही बोललो नाही

नाना पटोलेंच्या मुद्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना-भाजपा एकत्र होते, तेव्हाही जागा वाटपामध्ये अडथळे यायचे. आघाड्या निर्माण होतात, तेव्हा जागावाटपात असे अडथळे येतात. मी नाना पटोले यांच्याबद्दल असे म्हटलेले नाही. माझ्या तोंडी तुम्ही हे वाक्य घालू नका. मी कोणावरही व्यक्तीगत मतप्रदर्शन केलेले नाही. तेवढी सभ्यता, संस्कृतपणा आमच्यात आहे.

प्रादेशिक पक्षांना स्थान द्यावे

संजय राऊत माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले की, कॉंग्रेस हा मोठा राजकीय पक्ष आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत. प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय पक्षाने स्थान दिलं पाहिजे. केरळ, कर्नाटक तसच अन्य राज्यात प्रादेशिक पक्षांच्या जोरावर राजकारण सुरु आहे. प्रादेशिक पक्ष नसते, तर मोदी आज पंतप्रधान होऊ शकले नसते. इंडिया आघाडीत सर्वात जास्त प्रादेशिक पक्ष आहेत

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+