संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा चेहरा! 'मविआ'मध्ये पुन्हा मुख्यमंत्री कोण? वरुन शितयुद्ध

Sanjay Raut has hinted that Uddhav Thackeray will be the next CM : महाराष्ट्राचा चेहरा कोण हे ठरवण्यासाठी काँग्रेसला दिल्लीतून तर राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांची अनुमती घ्यावी लागते आम्ही म्हणतो की, महाराष्ट्राचा चेहरा उद्धव ठाकरे हेच आहेत असे म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरुन अंतर्गत घमासान सुरु असल्याचे संकेत दिले आहेत.

महाराष्ट्राचे नैतृत्व कोण करणार यावर विधानसभा निवडणुका घोषित होण्याआधी बराच खल झाला रस्सीखेचही झाली होती पण त्यानंतर हा वाद शमला होता पण काही बैठकांमध्ये या विषयांवरही होत असून आता महाराष्ट्राचा चेहरा अर्थात मुख्यमंत्री पदावरुन शितयुद्धाची चाहूल लागल्याचे दिसत आहे.

Sanjay Raut has hinted that Uddhav Thackeray will be the next CM

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजित पवार अशा नावासह अजित पवार यांना पाटी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज दिली. यावर संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, मी काय सांगू त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अजित पवार ही नाव असलेली पाटी दिली तो त्यांचा मुद्दा आहे असे म्हणत आपल्या भुमिकेवर ते आले.

अमित शहा नेपाळही जिंकू शकतात

संजय राऊत म्हणाले, अमित शहा नेपाळही जिंकू शकतात, ते म्यानमान जिंकू शकतात, ते श्रीलंकाही जिंकू शकतात, ज्यांच्या हातात प्रचंड पैसा आहे. ज्यांच्या हातात इव्हिएमची सूत्र आहेत ते कुठेही जिंकू शकतात. हरियाणा कसे जिंकले हे त्यांनी लोकांसमोर येऊन आपल्या छातीवर आणि आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे.

फोडा, झोडा आणि जिंका ही अमित शहांची निती

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात कोणत्या पद्धतीने अमित शहा लढत आहेत. महाराष्ट्रात त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. फोडा, झोडा आणि जिंका ही त्यांची निती आहे. लढण्याची खुमखुमी असेल तर आमचे शिवसेनेचे चिन्ह आधी गोठवायला नको होते. ते आम्हाला दिल्यावर मैदानात या.

ही पार्टी तोड ती पार्टी तोड हे गृहमंत्र्यांचे काम नाही

संजय राऊत म्हणाले, देशात कायदाव्यवस्था बिघडली आहे. देशात अशीच परिस्थिती आहे. जम्मू काश्मीर मणीपूरवर बोलत नाही. ही पार्टी तोड, ती पार्टी तोड गृहमंत्र्यांचे हे काम आहे का, सरदार पटेल लोहपुरुष आहेत त्यांच्यासारखे कर्तव्य अमित शहा निभावत नाहीत.

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा चेहरा

संजय राऊत म्हणाले, दोन चार जागांसंदर्भात जागावाटपाची चर्चा सुरुच राहील. काँग्रेसने स्टँड घेतले नाही आम्हाला सँड घ्यायचा आहे. आमच्या महाराष्ट्राचा चेहरा उद्धव ठाकरे आहे. या राज्याचे नैतृत्व उद्धव ठाकरे हे करतील मी जर असे म्हणालो तर मुख्यमंत्री कोण हे प्रश्न विचारायची गरज नाही.

साऱ्या महाराष्ट्राचे ठाकरे कुटुंबप्रमुख

संजय राऊत म्हणाले, काँग्रेस पक्षाला त्यांचा चेहरा ठरवायला दिल्लीतून आणि राष्ट्रवादीला चेहरा ठरवण्यासाठी शरद पवारांची मान्यता घ्यावी लागते पण आम्ही असे म्हणतो की, महाराष्ट्राचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेच आहेत, कुटुंबप्रमुख म्हणून ममतेने सारा महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+