मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री धनंजय मुंडेंचे लाड का करतात, कारवाई का होत नाही?- संभाजीराजेंचा हल्लाबोल
Chhatrapati Sambhajiraje on Dhananjay Munde : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राज्यात सद्या गाजत आहे. या प्रकरणाचा मास्टरमाइंड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप केला जात आहे. तर आज संभाजीराजे छत्रपती यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर फडणवीस व अजित पवार यांना देखील सवाल केला.
धनंजय मुंडे म्हणाले मी राजीनामा दिला नाही?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यातच धनंजय मुंडे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार का? याबाबत चर्चांना देखील उधाण आले होते. मात्र, आज धनंजय मुंडे यांनी मी राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

मुंडे ओबीसी नेते असल्याने सरकार भूमिका घेत नाही का?
छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागणं हे दुर्दैव आहे. जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे. धनंजय मुंडे यांच्यामध्ये इतकं काय आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे काहीच कशी भूमिका घेत नाहीत. धनंजय मुंडे ओबीसी समाजाचे आहेत म्हणून सरकार ठोस भूमिका घेत नाही का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
अजित पवार केवळ मुर्खात काढत आहेत काय?
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येला जातीय रंग देऊ नये. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट केवळ नवीन वर्षाचे शुभेच्छा देण्यासाठी होती का? महाराष्ट्राच्या जनतेला मुर्खात काढत आहात का? संतोष देशमुख यांना मारत असल्याचे अनेक व्हिडिओ पोलिसांना मिळाले आहेत. पोलीस ते व्हिडिओ जनतेसमोर का आणत नाहीत? संतोष देशमुख यांच्या हत्येची तपासणी करण्यासाठी एसआयटी नेमली, त्यामध्ये वाल्मीक कराड सोबत संबंध असलेले अधिकारी आहेत.












Click it and Unblock the Notifications