मस्ती करणाऱ्यांना दणका, राज ठाकरें CM फडणवीस, निशिकांत दुबेवर बरसले! काय म्हणाले वाचा 4 पाॅईंटमध्ये
Raj Thackeray Speech : राज्यात मराठीवरुन तापत असलेले राजकारण अजूनही तापलेलेच आहे, याची प्रचिती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेतील भाषणाच्या स्वरुपात आली. आज राज ठाकरेंनी महाराष्ट्राबाहेरुन येत राज्यात सत्ता स्थापन करणारे अन् मुद्दामहून मराठीचा अनादर करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. बाहेरुन यायचे आणि महाराष्ट्रात दादागिरी, मस्ती करणार असाल तर दणका बसणार असा इशारा त्यांनी दिला.

राज ठाकरे यांची आज मीरा भाईंदर येथे सभा झाली. त्यात त्यांनी हिंदी भाषेची सक्ती, मराठीचा अनादर या विषयाला हात घातला यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडलं. राज ठाकरेंनी केलेल्या भाषण काय आहे आणि ते नेमके काय म्हणाले हे आपण चार मुद्द्यात समजून घेऊ.
1. मुख्यमंत्री मराठी भांडतोय हिंदीसाठी
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा आपल्या भाषणातून साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की, तिसरी भाषा हिंदी करणार म्हणजे करणार, मोर्चाच्या धसक्यानेच त्यांनी निर्णय मागे घेतला. महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत हिंदीची सक्ती आणण्याचा प्रयत्न करु नका.दुकान नव्हे तर शाळाच बंद करेल असे म्हणत त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय असा टोला लगावला.
2. कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली
राज ठाकरेंनी मराठीची अहवेलना आणि अनादर करणाऱ्यांना स्पष्ट शब्दात सुनावलं. मिठाईवाल्याचा काय प्रसंग घडला असे सांगत त्यांनी अरेरावीमुळे कानफटात बसली, बाकी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. त्यांच्या कानफटात मारली का असा सवाल करत मारायला हवं असं म्हटलं.यावेळी त्यांनी राजकीय पक्षाचं ऐकून बंद केला असा आरोपही केला. मस्ती दाखवू नका मस्ती दाखवली तर दणका बसणार म्हणजे बसणार असा सज्जड दमही त्यांनी दिला.
3. भाजप खासदार दुबेंना मोठा इशारा
राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या आणि मराठीविरुद्ध भाषा बोलणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना थेट इशारा दिला. दुबेंनी मराठी भाषिकांना मारहाण करु असं वक्तव्य केलं होतं, त्यावर राज ठाकरेंनी मुंबईत या मग दुबेंना डूब, डूब कर मारेंगे असे म्हणत प्रत्युत्तर दिलं. कडवट हिंदू आहोत पण हिंदी नाही असं म्हणत त्यांनी हिंदी सक्ती केली तर माझ्यासारखा कडवड सापडणार नाही असंही म्हणाले.
4. बाहेरच्यांनी येऊन सरकार स्थापन करायचे नाही
देशाचे प्रथम गृहमंत्री सरकार वल्लभभाई पटेल यांच्यावर राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून मोठा आरोप केला. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा पहिला मानस पटेल यांचा होता. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये म्हणून मराठी माणसांवर गोळीबार करण्यात आला मोरारजी देसाईंचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. गुजरात्यांचा अनेक वर्षांपासून मुंबईवर डोळा आहे. हिंदी भाषा महाराष्ट्रात आणण्याचा डाव आहे आणि हे चाचपडून पाहिले जात आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडून गुजरातला नेण्याचा डाव आहे. बाहेरच्यांनी इथं येवून सरकारं स्थापन करायचे नाही. या हिंद प्रांतावर फक्त आमची सत्ता आहे. तुम्ही या महाराष्ट्राचे मालक. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे असं वागत आहेत. बाहेरची माणसं येवून इथं माज दाखवतात. पण, कुणी असा माज दाखवला तर त्याला सोडायचं नाही. त्याला ठेचायचं म्हणजे ठेचायचचं असंही राज ठाकरे म्हणाले.












Click it and Unblock the Notifications