राहुल नार्वेकर दुसऱ्यांदा झाले विधानसभा अधक्ष, बिनविरोध निवड फडणवीस म्हणाले- नाना पटोले माझे मित्रच!
Rahul Narvekar became Speaker of Legislative Assembly : विधीमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार भाषण केले. विधानसभा अध्यक्षपदाची धुरा अनेक धुरंधरांनी सांभाळली त्यात नाना पटोलेही होते ते जरी राजकीय विरोधक असले तरीही ते माझे मित्रच आहेत असे वक्तव्य फडणवीस यांनी केली.
विधीमंडळाच्या अधिवेशनात आज राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून आज निवड झाली. यानिमित्त राहुल नार्वेकर यांच्याबद्दल शुभेच्छापर भाषण देताना देवेंद्र फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्रातील विधानभवनात चर्चा आणि निर्णय होतात
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचे विधानमंडळाचे स्थान देशात वर आहे. या विधानमंडळात चर्चा होते कायद्यावर वादविवाद होते. महाराष्ट्रात व्यवस्थित अधिवेशन होऊन निर्णय होतात ही परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे. अध्यक्षाला सभागृहात बसून काम करावे लागते.
कोण कोणत्या पक्षात समजत नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोण कुठे कोण कोणत्या पक्षात हे समजत नाही. पण विधानसभा अध्यक्षांनी हे समजून घेत माहिती घेतली. न्यायधीशांसारखे अध्यक्ष प्रश्न विचारायचे तेव्हा निश्चितपणे एक अध्यक्ष म्हणून त्यांच्याबद्दलचा सन्मान आमचा वाढला. प्रथा परंपरा कायद्याचा अभ्यास करत अध्यक्षांनी निर्णय दिला त्यावर आता सर्वोच्च न्यायालय जे निर्णय द्यायचा ते देतील.

राजकारण्यांत श्रद्धा अन् सबुरी हवी
देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही लोकांनी अध्यक्षांवर (राहूल नार्वेकर) पातळी सोडून टीका केली. पण त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी शांतपणे आपले कर्तव्य पार पाडले. सत्याला तीन बाजू असतात एक खरी, एक विरोधकांची एक सत्ताधाऱ्यांची बाजू असते. जी बाजू योग्य असेल तो निर्णय अध्यक्षांनी दिला. मला असे वाटते की, आपल्यातील गुणवत्ता आणि संयम ते दाखवून देतात. श्रद्धा आणि सबुरी हे साईबाबांचे दोन वाक्य आहेत या दोन गोष्टी जर राजकारण्यांना समजल्या तर जीवनात दुःख कमी होते आणि राजकारणातील वाटही समजते.
बाजारासारखे विधीमंडळाचे वातावरण असू नये
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक नवीन सदस्य विधीमंडळात आहेत प्रत्येक सदस्यांना वाटते की, मला बोलू द्यायला हवे. पक्षांची भूमिका व्यवस्थित जावी म्हणून गटनेते बोलावे लागतात. विधीमंडळात बाजारासारखे वातावरण असू नये. असे म्हणत त्यांनी विधीमंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुला नार्वेकर यांचे अभिनंदन केले. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि इतर सदस्यांनीही नार्वेकर यांचे अभिनंदन केले.












Click it and Unblock the Notifications