Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाविकास आघाडी सरकारमुळे मेट्रोचे काम लटकले त्यांचे खड्डे आम्ही बुजवले! - पीएम मोदींचा टोला

PM Narendra Modi inaugurate Metro Road Project : आम्हाला विकास देखील करायचा आहे अन् कॉंग्रेसने निर्माण केलेले खड्डे देखील बुजवायचे आहेत. दुसरीकडे कॉंग्रेस अन् महाविकास आघाडीवाले केवळ विकास कामांना खोडा घालतात, मुंबईत त्याचा सर्वात मोठा अडथळा दिसून येत आहे, महाविकास आघाडीवाल्यांनी त्यांच्या अहंकाराने मेट्रोचे काम रोखले, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल चढवला.

Narendra Modi

महाविकास आघाडी सरकारमुळे मेट्रोचे काम लटकले होत. "विकासासाठी आम्हाला डबल मेहनत करावी लागत आहे. एकीकडे विकास करावा लागतोय तर दुसरीकडे काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी (मविआने) निर्माण केलेल्या खड्ड्यांनाही बुजवावे लागत आहे" असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडेले आहे.

ठाणे येथे 32 हजार 800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. महाराष्ट्राच्या देवीशक्तींना अर्थात साडेतीन शक्तीपीठांना आणि महापुरुषांना पंतप्रधानांनी नमन केलं.

विकासासाठी डबल मेहनत

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, विकासासाठी डबल मेहनत करावी लागत आहे. विकास पण करावा लागतोय आणि काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्माण केलेल्या खड्ड्यांनाही बुजवावे लागत आहे. मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी आहे. आमच्या सरकारने या स्थितीला बदण्याचा प्रयत्न केला. आज मुंबई महानगरात जवळपास तिनशे किमीचे मेट्रो जाळे तयार होत आहे. मरीन ड्राईव्ह ते बांद्राचा प्रवास कोस्टल रोडहून प्रवास बारा मिनिटांत पुर्ण होत आहे.

मविआच्या अहंकारामुळे मेट्रोचे काम लटकले

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, एकीकडे महायुतीचे सरकार विकासाला प्राधान्य देते तर काँग्रेस आणि महाआघाडीवाले लोक काम अडवतात. त्यांना फक्त विकासकामांत अडवण्याचे काम अथडळे आणण्याचे काम करता येते. महाविकास आघाडीच्या सरकारने आपल्या अहंकारात मेट्रोचे काम लटकवले. अडीच वर्ष काम अडकल्यामुळे या प्रकल्पाची किंमत १४ हजार रुपये कोटींनी वाढली. हा पैसा कुणाचा होता , तो महाराष्ट्राच्या नागरीकांचा नव्हता का तो पैसा महाराष्ट्राच्या टॅक्सपेअरचा होता.

पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, मविआ ही महाविकास विरोधी लोक आहेत. त्यांनी अटलसेतूला विरोध केला. मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम थांबवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील दुष्काळी प्रकल्पांनाही अडवले होते. ते जनतेचे प्रत्येक काम रोखत होते आता त्यांना सत्तेच्या बाहेर रोखा. काँग्रेस भारताची सर्वात बेईमान आणि भ्रष्ट्र पक्ष आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला. कोणत्याही काळात, कोणत्याही राज्य असो काँग्रेसचे चरित्र उघड आहे. त्यांचा एक मुख्यमंत्र्‍याचा घोटाळा समोर आला. हरियाना काँग्रेस नेता ड्रग्जसोबत पकडला गेला. आधी ते वचनं देतात मग जनतेचे शोषण करतात. नवीन टॅक्स लावून ते पैसे जमा करतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हिमाचलप्रदेशमध्ये काँग्रेस सरकारने टाॅयलेट टॅक्स लावला आहे. काँग्रेस लुट आणि फसवणुकीचे भांडार आहे. ते टॅक्सच्या माध्यमातून जनतेला लुटतात तर महिलांना शिव्या देतात हीच काँग्रेसची ओळख आहे. फक्त काही दिवसांचाच त्यांचा इतिहास मी सांगितला ते वर्षांनुवर्षे असेच करत आहे. काँग्रेसने रंग दाखवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजना सुरु केली. महाआघाडीवाल्यांना ही गोष्ट रुचत नाही. ते वाट पाहत आहे की, संधी मिळाली तर ते एकनाथ शिंदेंवर राग व्यक्त करतील. एकनाथ शिंदे यांनी ज्या योजना आणल्या त्या बंद करतील.

पैसा महिलांच्या हाती नाही तर काँग्रेसच्या दलालांना मिळावे म्हणून काँग्रेस प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे खरे रंग दिसत आहे. काँग्रेस आता अर्बन नक्षल्यांची गँग चालवत आहे. काँग्रेस अपयशी ठरत असतानाही सरकार बनवण्याचे स्वप्न रचत आहे. मविआ आणि काँग्रेसचे मिशन समाजात फुट पाडा आणि सत्तेवर कब्जा करा आहे.

मराठीला अभिजात दर्जा दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज एक मोठी आनंदाची बातमी घेऊन मी महाराष्ट्रात आलो आहे. केंद्र सरकारने आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हे केवळ मराठी आणि महाराष्ट्राचा सन्मान आहे असे नाही ते अशा परंपरेचा सन्मान आहे ज्याने देशाला ज्ञान, दर्शन, साहित्याची समृद्धी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नवरात्रीत विकासकार्याच्या उद्घाटनाचे भाग्य मिळाले आहे. देशातील साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी आणि अनेक विकास प्रकल्पाचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्रात आधुनिक विकास होत आहे. मुंबईत मेट्रोची सुपरफास्ट ट्रेन सुसाट धावणार आहे. आझ महायुती सरकारने मुंबई एमएमआरमध्ये अनेक प्रोजेक्ट सुरू केले होते. नवी मुंबई एअरपोर्ट, नैना प्रोजेक्ट, खेडा ते आनंदनगर इस्टन फ्रिवे, ठाणे मनपा नवी इमारक अशा अनेक विकास कामांचे उद्घाटन आज झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज आरे ते बीकेसी ही मुंबईच्या अॅक्वालाईन मेट्रोचा शुभारंभ होत आहे. या लाईनचा मुंबईतील लोक अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. ही मेट्रो भारत-जपान मित्रत्वाचेही प्रतीक आहे. ठाण्याला बाळासाहेब ठाकरेंचे विशेष प्रेम होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+