'2100 रुपये देणार असे कोणी म्हटले नाही', फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचे 'लाडकी बहीण' बाबत घुमजाव!
Narhari Jirwal on Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, लाडक्या बहीणींना 2100 रुपये देऊ असे महायुतीच्या नेत्यांनी घोषणापत्रात म्हटले होते. मोठ्या घोषणा देखील केल्या होत्या. त्याचा परिणाम की काय, विधानसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार यशही मिळाले, एव्हाना तशी कबुली देखील महायुतीच्या बड्या नेत्यांनी दिली.
सरकार स्थापन होऊन चार महिने होत नाही तोच आता देवेंद्र फडणवीस सरकारमधील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत असे विधान केले की, त्यामुळे राज्यात पुन्हा चर्चा रंगली आहे. तर झिरवळ यांच्यावर आता विरोधी नेत्यांकडून देखील टीका केली जात आहे.

काय म्हणाले मंत्री नरहरी झिरवळ?
राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे कॅबिनेटमंत्री नरहरी झिरवळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे विधान करून घुमजाव घातला. ते म्हणाले की, 'लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही', हे विरोधकच म्हणत आहे. पंधराशे रुपये देणार नाहीत, असा प्रचार विरोधकांनी केला होता. पण सरकार ते नियमितपणे देत आहे. आता 2100 रुपये देणार, असा प्रचार विरोधकच करत आहेत. मुळात लाडक्या बहिणी १५०० रुपयांवर खूश आहेत, असे म्हणत त्यांनी घुमजाव केला.
एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार?
लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्यातील हफ्ता कधी जमा होणार, याची प्रतिक्षा सध्या लाडक्या बहिणींना आहे. तसेच, 1500 रुपयांचे 2100 कधी होणार याची देखील उत्सुकता देखील त्यांना लागून आहे. मात्र, लाडक्या बहिणींच्या हप्त्यावरुन सत्ताधाऱ्यांची टोलवाटोलवी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्यात नरहरी झिरवाळ यांचे विधान घुमजाव करणारे असल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर
लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामध्ये या योजनेचा वाटा महत्त्वाचा ठरला. कारण, महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देऊ, असं आश्वासन देण्यात आलं होत.
जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो, असे म्हणून 2100 रुपये देणं टाळलं
महायुती सरकार पुन्हा सत्तेत येऊन देखील लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये पुन्हा वाढ न करण्यात आल्यानं विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. त्यावर जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो, असं उत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलं आहे. मात्र, आता तर 1500 रुपयांत लाडक्या बहिणी खुश आहेत, 2100 देऊ असं कोणी म्हटलंच नसल्याचे झिरवळ यांनी विधान केलं. त्यांच्या या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत, तर मंत्री उघडपणे कसा घुमजाव करत आहे, असाही आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे.
एप्रिलच्या हप्त्याबाबत आदिती तटकरे काय म्हणाल्या?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिना संपायच्या अगोदर प्राप्त होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. पुणे येथे पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी याबाबत मोठे विधान केले होते. ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच पहिल्यापासून निधी दिला जातो, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं. नमो शेतकरी योजनेतून ज्या महिलांना एक हजार रुपये मिळतात, त्यांना 500 रुपये मिळतील, योजनेचे दोन शासन निर्णय होते त्यामध्येच निश्चित करण्यात आलं होतं, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications