'काँग्रेसनं जाहीरपणे बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करुन दाखवावं'; PM मोदींचे खुले आव्हान

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसने जाहीरपणे बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करुन दाखवावं, असं खुलं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या योगदानाचे जाहीरपणे कौतुक करण्याची हिंमत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे का?, बाळासाहेबांच्या कार्याची प्रशंसा करताना काँग्रेसचे नेते एक शब्दही उच्चारत नाहीत, ही किती शोकांतिका आहे, माझे त्यांना आव्हान आहे की, त्यांनी जाहीरपणे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे व त्यांच्या योगदानाचे कौतुक करुन दाखवावे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. धुळे, नाशिकनंतर शनिवारी मोदींनी अकोला व नांदेड येथे जाहीर सभा घेत महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला.

Narendra Modi Challenge to Sharad Pawar Rahul Gandhi

मविआ म्हणजेच संधीसाधू प्रयोग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले हे आव्हान आजची महाविकास आघाडी (MVA) किती अनैसर्गिक आणि संधीसाधू आहे, याचे द्योतक आहे. ज्या विचार आणि तत्वांसाठी बाळासाहेब नेहमी लढले त्या विरुद्ध महाविकास आघाडीचे काम आहे. सशक्त आणि स्वाभिमानी महाराष्ट्र हे बाळासाहेबांचे स्वप्न होते, तर महाविकास आघाडी ही केवळ सत्तेसाठी केलेला संधिसाधू प्रयोग आहे.

या संधीसाधू महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्राच्या विकासावरच परिणाम होणार नाही तर त्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्यालाही हानी पोहोचू शकते. ही मविआची युती महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी धोक्याची घंटा आहे, हे जनतेने समजून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील जनतेने बाळासाहेबांच्या विचारसरणीला पाठिंबा देताना अशा बनावट आघाड्यांपासून अंतर राखण्याची वेळ आल्याचे देखील महायुतीकडून आवाहन केले जात आहे.

काँग्रेसकडून प्रत्येक जातीत फुट पाडण्याचे काम

नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना महाविकासवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, जाती जातीत भांडणे लावून सत्ता काबीज करणे हे काँग्रेसचे षडयंत्र आहे. मात्र आता काँग्रेसचे 'झुट की दुकान' महाराष्ट्रात चालणार नाही. काँग्रेस प्रत्येक जातीत फुट पाडण्याचे काम करीत असून ओबीसी समाजावर सतत अन्याय करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. एक हैं तो सेफ हैं हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. एक ओबीसी पंतप्रधान झाला हे काँग्रेसला सहन होत नसून त्याचा राग काँग्रेस ओबीसी समाजावर अन्याय करून काढत आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+