Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी! 9 जण जखमी! गोरखपूरला जाणाऱ्या रेल्वेत चढताना दुर्घटना

Mumbai News Bandra Terminus stampede : मुंबईच्या वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडला. यामध्ये 9 प्रवासी जखमी झाले असून ही घटना आज सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर घडली. गोरखपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढताना हा प्रकार घडला.

सविस्तर वृत्त असे की, रेल्वे क्र. 22921, वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेसची वेळ आज सकाळी पाच वाजून दहा मिनिटांची होती. ही गाडी प्लॅटफॉर्मवर असताना तिथे चढताना गर्दी झाली आणि यातच चेंगराचेंगरीही झाल्याने नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींना वांद्रेतील भाभा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे, तिथे जखमींची माहिती नोंदवण्यात आली आहे.

Mumbai News Bandra Terminus stampede

दुर्घटनेतील जखमींची नावे

1. शभीर अब्दुल रहमान वय 40, दाखल झालेली प्रकृती स्थिर.
2. परमेश्वर सुखदार गुप्ता वय 28, प्रकृती स्थिर.
3. रवींद्र हरिहर चुमा वय 30, प्रकृती स्थिर.
४. रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती वय 29, प्रकृती स्थिर.
5. संजय तिलकराम कांगे वय 27, दाखल झालेल्यांची प्रकृती स्थिर.
6.दिव्यांशू योगेंद्र यादव वय 18 दाखल झाले प्रकृती स्थिर
7.मोहम्मद शरीफ शेख वय 25, दाखल झालेल्यांची प्रकृती स्थिर आहे.
8. इंद्रजित सहानी वय 19, दाखल, प्रकृती गंभीर.
9. नूर मोहम्मद शेख वय 18, प्रकृती गंभीर.

नेमका काय प्रकार घडला?

प्राप्क माहितीनुसार वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरीची घटना घडली. सकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी या ट्रेनची वेळ होती त्यादरम्यान ही घटना घडली आहे. या दुर्घटनेतील सर्व जखमींवर भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दिवाळी आणि छट पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे वांद्रे ते गोरखपूर रेल्वेतून जाण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली.

दोघांची प्रकृती गंभीर

पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी गोरखपूरला जाणारी रेल्वे सुटते. सध्या दिवाळी आणि छटपूजा आहे. त्यामुळे या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रणाणात प्रवासी जमले होते. मात्र चेंगराचेंगरी झाल्याने एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. यातील सात जणांची प्रक्रिया स्थिर आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. दुर्घटनेच्या ठिकाणी पोलीस प्रशासन किंवा रेल्वे प्रशासनाचे कोणतेही अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसत आहे. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+