मुंबईकरांसाठी खूशखबर! 'या' महत्त्वाच्या रूटवर 'एवढ्या' लोकल ट्रेन वाढणार; गर्दी कमी होणार वेळ वाचणार
Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी आणि विशेषतः नवी मुंबईतील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे बेलापूर-उरण रेल्वे मार्गाचे मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण करत असून, याच महिन्याच्या अखेरीस या मार्गावर १० अतिरिक्त लोकल ट्रेन सेवा सुरू होणार आहेत. यासोबतच, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दोन नवीन रेल्वे स्टेशन - तरघर आणि गव्हाण - लवकरच प्रवाशांसाठी खुले केले जातील.

दोन नवीन स्टेशन लवकरच सुरू
तरघर स्टेशन: हे स्टेशन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहे. यामुळे विमानतळाचे कर्मचारी आणि प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
गव्हाण स्टेशन: यामुळे उरण आणि आसपासच्या रहिवाशांसाठी रेल्वेची कनेक्टिव्हिटी खूप सुधारेल.
काम किती पुर्ण झाले? : मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनुसार, या दोन्ही नवीन स्थानकांचे काम ९५-९६% पूर्ण झाले आहे.
प्रवास वेळेत होणार मोठी बचत
- सध्या नेरूळ/बेलापूर ते उरण मार्गावर लोकल ट्रेन साधारणतः एक ते दीड तासाच्या अंतराने धावतात.
- सध्या या मार्गावर दिवसातून एकूण ४० ट्रेन सेवा उपलब्ध आहेत, ज्या वाढवून ५० केल्या जातील (पाच अप आणि पाच डाउन).
लाभ काय होणार?: या सेवा वाढल्यामुळे दोन ट्रेन्समधील अंतर सरासरी १५ मिनिटांनी कमी होईल. यामुळे प्रवासातील गर्दी कमी होण्यास आणि प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होईल.
सिडकोने (CIDCO) तरघर आणि गव्हाण या दोन्ही स्टेशनचे बांधकाम केले आहे. प्रवाशांची तिकीट विक्री आणि वाढती
संख्या लक्षात घेऊन सध्या १० लोकल ट्रेन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications