एसआयटीत सालगडी असणारे अधिकारी नेमलेत; पुण्यातील मोर्चात 'या' मोठ्या नेत्याचा आरोप
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आज पुण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. सोनवणे यांनी एसआयटी पथक व पोलिसांवर गंभीर आरोप केले.

पोलिसांबाबत काय म्हणाले?
काल एका पोलिस अधिकाऱ्याने खा. बजरंग सोनवणे यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. मी जर पत्रकार परिषद घेतली तर खासदाराची चड्डीही राहणार नाही, असं त्या पोलिस अधिकाऱ्याने म्हटलं होतं. आज पुण्याच्या मोर्चात खा. सोनवणे यांनी त्या अधिकाऱ्याला ओपन चॅलेंज दिलं. खा. सोनवणे म्हणाले, काल तो पोलिस अधिकारी काहीतरी बोलला. मी आज त्याला विनंती करतो की, त्यानं एकदा प्रेस घ्यावीच. तुला विविध ठिकाणी पोस्टींग मिळण्यासाठी कुणाची मेहरबानी झाली, येत्या दोन दिवासांत मी सांगणार आहे, असंही खा.सोनवणे यांनी स्पष्ट केलं.
एसआयटीवरही केले आरोप
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी लावली पण त्यातले अधिकारी कोण आहेत? त्यांना खुर्चीवर कोणी बसवलंय? हे पण तपासायला पाहिजे, असं खा. बजरंग सोनवणे म्हणाले. ते पुढे म्हणाले, सालगडी असणारे अधिकारी एसआयटीमध्ये नेमण्यात आले आहेत. देशपांडे नावाचे सरकारी वकील केस घ्यायला घाबरले कारण यांची दादागिरी गुंडगिरी आणि दडपशाही. वकीलही केस घ्यायला घाबरत असतील तर यांची दहशत किती आहे, हे समजते, असंही सोनवणे म्हणाले.
त्यांना सहआरोपी करा
खा. बजरंग सोनवणे यांनी आरोपींनी मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, बीडमध्ये जीवन जगणं अवघड झालं आहे. या हत्यामागे जो मास्टरमाईंड आहे, त्याला पहिल्यांदा पकडा. तो खंडणीखोर आहे. सरेंडर झालेला आरोपी नेमका पकडला की सरेंडर झाला? असा सवालही यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला. एवढ्या दिवसांमध्ये आरोपी कुणाकुणाला भेटले? कोणी कोणाची मदत केली, त्या सर्वांना सहआरोपी करा अशी मागणी देखील सोनवणे यांनी केली आहे.












Click it and Unblock the Notifications