जरांगे पाटलांच्या आंदोलनामागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण, राज ठाकरेंचा हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर : माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा काहीही संबंध नव्हता. पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी या प्रकारचं राजकारण करत आहेत, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगरच्या दौ-यावर आहेत. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्यावर भाष्य केलं.
"आरक्षणाच्या संदर्भात आपण केलेल्या विधानावर जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या चालवल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. मी सोलापूरमध्ये जे बोललो, ते सगळ्यांनी पाहिलं, ऐकलं. पण त्यानंतर जाणीवपूर्वक केलेल्या बातम्या धक्कादायक होत्या. राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध वगैरे. वाट्टेल त्या बातम्या आल्या. 2006 साली मी माझ्या पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत आमची एकच भूमिका राहिली आहे. आरक्षण द्यायचंच असेल तर आर्थिक निकषांवर द्यावं. त्यावर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही", असं राज ठाकरे म्हणाले.

या सर्व गोष्टींशी, लोकसभेचा निर्णय लागला. यांना वाटलं मराठवाड्यात मतदान झालं. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी समजावून घेतलं पाहिजे की, ते मतदान मोदी आणि शाह यांच्या विरोधातील होतं. त्यांच्या प्रेमाखातरचं मतदान नव्हतं. मी नेहमी सांगत आलो. विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो. सत्ताधारी हरत असतो. त्यांना अँटी व्होट मिळाली, असं राज ठाकरे म्हणाले.
"मुस्लिम आणि दलितांनी देशभर मोदी विरोधात मतदान केलं. संविधान बदलणार हे भाजपचाच माणूस बोलला होता ना. इतर कुणी नरेटिव्ह केलेले नव्हतं. पण लोकं भडकले होते. त्यांनी मतदान केलं. पण ठाकरे-पवारांना वाटतं त्यांच्या प्रेमाखातर मतदान झालं. पण त्यांच्या प्रेमाखातर मतदान झालं नाही. त्यांना वाटतं विधानसभेला अशीच खेळी खेळावी" असं राज ठाकरे म्हणाले.
काल शिवसेनेचा जिल्हाप्रमुख त्याला आमच्या पोरांनी मार मार मारलं. नशिब पोलीसमध्ये पडले. तो ओरडत होता एक मराठा लाख मराठा, म्हणजे काय. त्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचे माणसं आहेत. यांच्याआडून यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे. हे लोकांसमोर आलं पाहिजे. सर्वांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे.
शरद पवारांसारखा 82-83 वर्षाचा माणूस स्टेटमेंट करतोय की महाराष्ट्राचा मणिपूर होईलय म्हणजे या लोकांनी मणिपूर होईल यासाठी चिंता वाहिली पाहिजे ते म्हणतात मणिपूर होईल यांच्या डोक्यात काय चालू आहे हे लक्षात घ्या" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications