मराठा समाज असा झटका देईल की तुम्हाला पश्चाताप होईल! मनोज जरांगेंचा 'यांना' मोठा इशारा
छत्रपती संभाजीनगर - राज्य सरकार केवळ आश्वासन देत आहे, सत्ताधारी वेळ मारुन नेत आहेत. त्यांनी मराठा समजाच्या जीवाशी खेळू नये,अन्यथा त्यांचे मोठे नुकसान होईल असा इशारा मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. ते छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते.
जिथे जायचे नाही तिथे कशाला नेता..
मनोज जरांगे म्हणाले, 29 ऑगस्ट रोजी मराठा समाज एकत्र येणार असून निर्णय घेतला जाणार आहे. समाजाला आरक्षण न देण्याचा निर्णय सरकारने घेतला असेल तर आम्हालाही पडायचा निर्णय घ्यावाच लागेल. सत्ताधारी समाजाला दार वेळी हुलकावणी देत आहेत. ज्या क्षेत्रात आम्हाला जायचे नाही. त्या राजकीय क्षेत्रात जाण्याची वेळ मराठा समाजावर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही आणली आहे.

मराठ्यांच्या जीवाशी खेळू नका..
मनोज जरांगे म्हणाले, सरकार फक्त आरक्षण देऊ असे आश्वासन देत आहे. कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळ लागत आहे. त्याला देखील वेळमर्यादा वाढवून द्यावी. सरकारने आश्वासनं न देता थेट मागण्या मान्य कराव्या. मराठा समाजाच्या गोर गरीब मुलांवर अन्याय केला जात आहे. समाजाच्या जीवाशी सरकारने खेळ खेळू नये. अन्यथा मोठ्या नुकसानाला सामोरी जावे लागेल.
आमची धग मराठवाड्यापुरती नाही
जरांगे म्हणाले, आमच्या आरक्षणाची धग मराठवाड्यापुरती नाही. मुंबईतही आमदारांना बसणे कठीण झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनी इकडे तोंड खुपसू नयेत.. गिरीश महाजन आले होते त्यांना विचारा काय झाले होते.
पवारांपेक्षा माझं मन 'जे' सांगतं...
मनोज जरांगे म्हणाले, शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन ,आणि विचार ,संस्कार काय सांगतात ते महत्वाचं आहे. धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. बंजारा समाजाला वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी आहे. ही माझी प्रामाणिक भावना आहे. आमच्यासह त्यांच्या लेकरांचेही कल्याण झाले तर काय हरकत आहे. आमची भूमिका ठाम आहे. वेळ प्रसंगी सर्व समाजाने एकत्र येऊन विधानसभेत पाडले पाहिजे'', असे जरांगे म्हणाले.
समाज असा झटका देईल की पश्चातापच
मनोज जरांगे म्हणाले, समाजाच्या बळापुढे कोणतीच सत्ता टिकत नाही आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करणे ही सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही जबाबदारी आहे. मात्र ते दोघे केवळ एकमेकांना बैठकीला बोलावतात. बैठकीला जात नाहीत. त्यामुळे दोघांनीही समाजाच्या बळाच्या नादी लागू नये. समाज असा झटका देईल की पश्चातापाची वेळ येईल.












Click it and Unblock the Notifications