Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमित शहांसमोर पहाटेपर्यंत खलबतं; महायुतीचं जागावाटप ठरलं, पहा कुणाला किती जागा?

नवी दिल्ली : दिल्लीत आज पहाटेपर्यंत खलबत होऊन महायुतीचं जागावाटप फायनल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी रात्री अडीच वाजेपर्यंत महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांची खलबतं सुरु होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत बहुतांश जागा निकाली निघाल्या तर फक्त काही जागांचा तिढा कायम राहिला. तो तिढाही अमित शहांच्या निर्णयानंतर लगेच सुटेल, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

पहाटेपर्यंत चालली खलबतं

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शुक्रवारी (19 ऑक्टोबर) रात्री महायुतीतील जागावाटपाचा मुद्दा निकाली निघाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीमध्ये गेले होते. या बैठकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा झाली. ज्या जागांवर वाद चालू होता, तो सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये महायुतीला बऱ्यापैकी यश आले. ही बैठक जवळपास अडीच तास चालली. जागावाटपाचा तिढा अमित शाह यांच्या समक्ष सोडवण्यात आला असून, आता फक्त काहीच जागांचा प्रश्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

mahayuti leader

कुणाला किती मिळाल्या जागा?

महायुतीचे भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांचे जागावाटप झाले. भाजपाला 288 जागांपैकी कमीत कमी 150 जागा हव्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 87 ते 90 जागा हव्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कमीत कमी 60 जागा हव्या आहेत. असे असताना जागावाटपाची ही चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अपेक्षित जागांपेक्षा काहीतरी कमीजास्त प्रमाण ठरवून हे जागावाटप फायनल झाल्याचे समजते.

उर्वरीत जागांचा तिढाही सुटणार

महारााष्ट्रातील बऱ्याच मतदारसंघांसाठी महायुतीत एकापेक्षा जास्त नेते इच्छुक आहे. या नेत्यांची त्या-त्या मतदारसंघांत तयारीही चालू आहे. त्यामुळे एका पक्षाला जागा सुटल्यास दुसऱ्या पक्षातील नेत बंड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाल्यास बंड शांत करण्याचे आव्हान महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांपुढे असणार आहे. दरम्यान, हीच बंडखोरी सांभाळण्यासाठी काही जागा मागे ठेवल्याचे समजते. त्या-त्या मतदारसंघातील इच्छुकांची मनधरणी करुन, बंडखोरी रोखून या जागांची घोषणा करण्यात येणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+