राज्याच्या विकासाला नवी चालना देणारे महाराष्ट्रातील हे मोठे प्रकल्प
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या चौफेर आर्थिक विकासासाठी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली महायुती सरकारने अनेक निर्णय घेतले. अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी केली. आपला भारत देश हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला असून आपला महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने जोमाने वाटचाल करीत आहे. महाराष्ट्राला देशाच्या प्रगतीचे इंजिन मानले जाते.
महाराष्ट्रातील उद्योगधंदे, बहरलेले सेवा क्षेत्र, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात भर घालीत असते. त्यामुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांना प्रचंड गती देणे आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करून घेणे ही सरकारची जबाबदारी असते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार याबाबतीत सरस ठरले आहे.

मुंबई- ठाणे- पुणे- नाशिक हा त्रिकोण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा प्रदेश आहे. उद्योगधंदे, चित्रपटसृष्टी, बाजारपेठा, आयटी कंपन्या, सेवा क्षेत्रातील कंपन्या यामुळे या चार शहरांना विशेष महत्त्व आहे. या चारही शहरांची लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार झपाट्याने वाढत चालला आहे त्यामुळेच येथील पायाभूत सुविधा अधिक भक्कम करणे आणि नव्या पायाभूत सुविधा त्यांच्याशी जोडून घेणे अनिवार्य बनले आहे. एकनाथ शिंदे यांनी जातीनिशी लक्ष घालून येथील विविध प्रकल्पाकडे आणि त्यांच्या पूर्ततेकडे भर दिला आहे.
महामुंबई हा महत्वाचा परिसर
पालघर जिल्ह्यात वाढवण येथे महत्त्वाकांक्षी बंदर उभारण्यासाठी केंद्र सरकारची नुकतीच मान्यता मिळाली आहे. सुमारे 76 हजार कोटी रुपये खर्चून बांधले जाणारे हे बंदर जगातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असणार आहे.नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ 2025 च्या डिसेंबर महिन्यात कार्यरत होणार आहे. हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे लँडिंग या विमानतळाच्या धावपट्टीवर नुकतेच करण्यात आले. त्यामुळे हा विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित होण्याची स्पष्ट निर्माण झाली आहेत. पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी कळंबोली सर्कलचा 770 कोटी रुपये खर्च करून विकास करण्यात येणार आहे. अटल सेतूमुळे मुंबई आणि महामुंबई हे अंतर अवघ्या वीस मिनिटात पार करणे शक्य झाले आहे.
विरार अलिबाग मल्टी मोडल कॉरिडोर
वाढवण,नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा विचार करून विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोरची आखणी करण्यात येत आहे.सुमारे 57 हजार कोटी रुपयांचा खर्चाचा हा प्रकल्प असून त्याची लांबी 126 किलोमीटर इतकी आहे. विरार नजीकच्या नवघर येथून सुरू होणारा हा कॉरिडोर अलिबाग पर्यंत जाणार आहे. मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वाहतुकीसाठी तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 2030 साली हा प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने लोकार्पित होण्याचा अंदाज आहे.
उद्धव ठाकरे यांनी केले होते दुर्लक्ष
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने अनेक प्रकल्पांना थंड्या बस्त्यात बांधून ठेवले. विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर हा त्यापैकीच एक प्रकल्प आहे. मात्र मुख्यमंत्रीपद प्राप्त होतात एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला गती दिली आहे. मार्च 2024 पर्यंत या प्रकल्पावर 650 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी 2024-25 च्या अर्थसंकल्पात बावीस हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पुणे रिंग रोडच्या पूर्ततेसाठी प्रयत्न
ज्या प्रमाणात मुंबई शहराचा विस्तार होत आहे त्याच गतीने पुणे शहर देखील वाढत आहे.महाराष्ट्राची आयटी क्षेत्राची राजधानी म्हणून पुण्याचा लौकिक आहे. त्याशिवाय अन्य उद्योग देखील पुण्यात चांगले स्थिरावले आहेत .रिंग रोड ही पुण्याची तातडीची गरज आहे. सुमारे 36 हजार 858 कोटी रुपये खर्च करून रिंग रोड उभारण्यात येणार आहे.शहराच्या विविध भागातून जाणारा 128 किलोमीटरचा रिंग रोड 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला गती दिली. गृहनिर्माण आणि नगर विकास महामंडळाने या प्रकल्पासाठी पाच हजार पाचशे कोटी रुपये मंजूर केले आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील या प्रकल्पावर 3184 कोटी रुपये खर्च केले आहेत विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी दहा कोटी रुपयांचा सुद्धा खर्च केलेला नाही. महायुती सरकारने मात्र या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी विशेष मेहनत घेतली आहे.
मुंबई पुणे मिसिंग लिंक पूर्णत्वाकडे
1995 साली शिवसेना भाजपा युतीचे सरकार सत्तेत आले तेव्हा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची उभारणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खंबीर पाठिंब्याने करण्यात आली. या दृत गती महामार्गामुळे मुंबई आणि पुण्यातील अंतर प्रचंड कमी झाले. या मार्गावरून रोज हजारो वाहने ये जा करीत असतात. मुंबईहून पुणे तसेच कोल्हापूरकडे जाणारी आणि मुंबईतून कोकणाकडे जाणारी वाहने देखील याच महामार्गाचा उपयोग करून आपला प्रवास करीत असतात.
मुंबईहून पुण्याला जाण्याचे अंतर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाला प्रचंड गती दिली. सहा हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. मुंबईहून पुण्याला जोडणाऱ्या घाटात बोगदा काढून मुंबई पुणे अंतर कमी करण्यात येणार आहे. हा प्रकल्प 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील महायुती सरकारने या प्रकल्पावर 4300 कोटी रुपये खर्च केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने मात्र या प्रकल्पावर अवघे 1716 कोटी रुपये खर्च केले आहेत.
महायुती सरकार म्हणजे पायाभूत सुविधांना गती
महायुतीचे सरकार म्हणजे पायाभूत सुविधांना प्रचंड गती असेच समीकरण आहे. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प पूर्ण करण्यात आला. शिवसेना भाजपा युतीच्या काळात मुंबई पुणे दुरुस्ती महामार्ग पूर्णत्वास गेला. शिवसेना भाजपा युती सरकारच्या काळात समृद्धी महामार्ग पूर्ण झाला. मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली. पालखी मार्गाची सुधारणा झाली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवून विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर, पुणे रिंग रोड आणि मुंबई पुणे मिसिंग लींक प्रोजेक्ट या महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती दिली आहे. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यात हे प्रकल्प मोलाचे योगदान देणार आहेत.












Click it and Unblock the Notifications