Maharashtra Weather : पुढील चार दिवस कुठे-कसा पाऊस पडणार?, विदर्भ, कोकणात कशी असणार स्थिती?
Maharashtra Weather Update News : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र, आता ऑगस्टच्या (2 ते 6 ऑगस्ट 2025) पहिल्या आठवड्यात पावसाने काहीसा ब्रेक घेतला आहे.
तरीही, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवसांत राज्याच्या विविध भागांत पावसाची शक्यता कायम असून, विशेषतः विदर्भ आणि तळ कोकणात पावसाचा जोर हळूहळू वाढणार आहे.
पुढील 4 दिवसांसाठी हवामान अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्राच्या दक्षिण भागात तयार होत असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणून, येत्या काही दिवसांत विदर्भ, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता अधिक आहे.

यलो अलर्ट जाहीर केलेले जिल्हे!
विदर्भ
वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ राहून काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
दक्षिण महाराष्ट्र अन् कोकण
तळ कोकण, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढणार आहे. यासोबतच पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जिल्हानिहाय संभाव्य हवामान
२ ऑगस्ट
वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे यलो अलर्ट.
३ ऑगस्ट
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर येथे यलो अलर्ट. तळ कोकणासह कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये हलक्या पावसाची शक्यता.
४ ऑगस्ट
सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे यलो अलर्ट. तळ कोकणासह पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता.
५ ऑगस्ट
लातूर, धाराशिव, सोलापूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे यलो अलर्ट.
६ ऑगस्ट
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर येथे यलो अलर्ट.
नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी!
एकंदरीत, ऑगस्टच्या सुरुवातीला राज्याच्या काही भागांत पावसाची उघडीप असली तरी, विदर्भ, तळ कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची सक्रियता वाढण्याची चिन्हे आहेत. नागरिकांनी हवामानातील या बदलांनुसार योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल.












Click it and Unblock the Notifications