Maharashtra New CM Oath : मी पुन्हा आलो! देवेंद्र फडणवीसांनी घेतली तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ
Maharashtra New CM Oath Ceremony : महायुतीच्या विजयाचे शिल्पकार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज शिवाजी पार्कवर आयोजित समारंभात शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले असून त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली. फडणवीस यांनी 2019 ला म्हटलेले "मी पुन्हा येईल" हे वाक्य आज खरे ठरवले आहे. मुख्यमंत्री म्हणून तेच या पदाचे प्रमुख दावेदार होते आणि त्यांनाच हे पद मिळाले आहे.
महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे प्रफुल गुडधे यांचा पराभव केला. 5 डिसेंबर 2024 म्हणजेच आजपासून त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सुरु झाला आहे. महायुतीतील तीन प्रमुख पक्षांच्या बळावर हे सरकार असल्याने आणि भक्कम बहुमत असल्याने आता ते पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी राहू शकतात.

फडणवीस याआधी 2014 2019 दरम्यान होते मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे अठरावे मुख्यमंत्री होते. नैऋत्य नागपूर हा त्यावेळी त्यांचा मतदारसंघ होता. 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 असा 5 वर्षे, 12 दिवस त्यांचा कार्यकाळ होता. मुख्यमंत्रीपदाची टर्म त्यांनी पूर्ण केली होती.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे घेतलेला शपथविधी चांगलाच गाजला होता. यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली होती. सत्तेसाठी हपापले असेही आरोप त्यांच्यावर तेव्हा झाले होते. त्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले, त्यादरम्यान भाजपने शिंदे यांना साथ दिली आणि महायुतीचे सरकार जून 2022 मध्ये स्थापन झाले. त्यावेळी मुख्यमंत्रीपद फडणवीस यांच्या हातातून गेले होते. ते न मिळाल्याने ते व्यथितही झाले होते. त्यांची उघड नाराजीही दिसून आली होती. मंत्रमंडळात राहण्याऐवजी पक्षवाढीसाठी काम करु असेही ते म्हणाले होते. मात्र, यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींचा आग्रह आणि आदेश मानत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळी मात्र तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले आहेत.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीस आज होणार CM, आतापर्यंत 21 जण झाले मुख्यमंत्री, ते कोण? वाचा संपूर्ण यादी
नगरसेवक ते मुख्यमंत्री
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रफुल्ल गुडधे पाटील यांचा पराभव करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेला हा मतदारसंघ देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा खिशात टाकला.
गेल्या दहा वर्षात राज्यात राजकीय वर्तुळात सर्वाधिक प्रसिद्ध असलेले नाव म्हणजे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. शिक्षणाने वकील आणि व्यवस्थापनाची पदवी असलेल्या फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नगरसेवक, सर्वात कमी वयाचा महापौर अशी पदे भूषवित 1999 साली ते पहिल्यांदा आमदार झाले. भारतीय जनता युवा मोर्चा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशीही ते संबंधित होते. रामजन्मभूमी आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
हेही वाचा : महायुती सरकारचा आज शपथविधी! देवेंद्र फडणवीस, शिंदे, अजितदादा यांच्यात सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या
2014 साली मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात
1999 साली राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार गेले आणि युतीला विरोधी बाकांवर बसावे लागले. आमदारकीच्या पहिल्या वेळेपासूनच सभागृहातील अभ्यासू आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपली ओळख निर्माण केली. सलग तीन निवडणुका त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले. सभागृहातील त्यांच्या भाषणांची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही घेतली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली. 2014 साली मुख्यमंत्री पदाची माळ अचानकपणे त्यांच्या गळ्यात घालण्यात आली.
हेही वाचा : Maharashtra CM : देवेंद्र फडणवीसांबाबत विचारले जातात 'हे' 8 प्रश्न, काय आहेत याची उत्तरे? जाणून घ्या
धोरणी, मुत्सद्दी, मृदुभाषी, परखडही
धोरणी, मुत्सद्दी, मृदुभाषी आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांनी राजकीय प्रवास केला. जनहिताच्या अनेक योजना आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी राबवल्या. पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प पूर्ण करून "इन्फ्रा मॅन" अशी ओळख त्यांनी निर्माण केली. शिवसेनेसारख्या बेभरवशी सहकार्याला सोबत घेऊन सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी टिकून राहण्याचा अलीकडच्या काळातला विक्रम त्यांच्या नावावर आहे. मराठा आरक्षण, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार, मुंबई मेट्रो अशा अनेक योजना त्यांनी महाराष्ट्राला दिल्या.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री! नगरसेवक ते CM, जाणून घ्या संपूर्ण जीवनगाथा
डावपेच आखून महाविकास आघाडीला दिला हादरा
2019 साली मुख्यमंत्रीपदाच्या भरल्या ताटावरून त्यांना उठावे लागले. पण स्वतःवर आलेली विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी अत्यंत गांभीर्याने स्वीकारत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला सळोकी पळवून सोडले. एका निर्णायक क्षणी घाव घालून महाविकास आघाडी सरकार गडगडले आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबतीने अडीच वर्षे समर्थपणे महायुतीचे सरकार चालवले. महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून त्यांना ओळखले जाते. सर्व पक्षीय आमदारात असलेली मैत्री आणि विश्वासार्हता तसेच कार्यक्षमता ही त्यांच्या राजकारणाची वैशिष्ट्ये आहेत. महाविकास आघाडीचा क्रमांक एकचा राजकीय शत्रू म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीवर पंकजा मुंडे, आशिष शेलार यांच्यासह सर्व भाजप नेते काय म्हणाले...
-
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी; मतदार यादी जाहीर, 'बिनविरोध'साठी हालचाली! -
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
विश्वविजेत्या टीम इंडियावर BCCIकडून पैशांचा पाऊस! ICCपेक्षा चौपट अन् 2024च्या पेक्षाही मोठं बक्षीस! -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान










Click it and Unblock the Notifications