Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अतिवृष्टीग्रस्तांसाठी ऐतिहासिक पॅकेज:खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी ३.५०लाख;३१,६२८ कोटींची मदत जाहीर

Maharashtra Flood Relief 2025 : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अखेर सरकारने ऐतिहासिक मदत पॅकेज जाहीर करून तिजोरी खुली आहे. दिवाळी सणाला काहीच दिवस शिल्लक असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन या ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या महा-पॅकेजची घोषणा केली.

या पॅकेजमधील सर्वात मोठी घोषणा म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन पुराच्या किंवा अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून (खरडून) गेली आहे, त्यांना हेक्टरी तब्बल ३.४७ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. या पॅकेजमुळे बळीराजाच्या खात्यावर दिवाळीपूर्वीच मदतनिधी जमा होणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Maharashtra Flood Relief 2025

खरडून गेलेल्या जमिनीसाठी ३.४७ लाखांचे भरघोस अनुदान

सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये जमिनीचे झालेले प्रचंड नुकसान भरून काढण्यावर विशेष लक्ष दिले आहे. जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी: या शेतकऱ्यांना हेक्टरी ४७ हजार रुपये रोख स्वरूपात नुकसान भरपाई मिळेल आणि उर्वरित हेक्टरी ३ लाख रुपये नरेगाच्या (NREGA) माध्यमातून जमीन पूर्ववत करण्यासाठी देण्यात येतील. एकूण, जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना जवळपास हेक्टरी ३.४७ लाख रुपये इतकी भरघोस मदत मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे मदत पॅकेज आहे. राज्यातील अतिवृष्टीमुळे ६८ लाख हेक्टर इतक्या जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने २९ जिल्ह्यांमधील २५३ तालुके सरसकट मदतीसाठी निवडले आहेत. येथे ६५ मिमी पावसाची अट न ठेवता सरसकट सर्व प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तात्काळ १० हजार रुपये

शेतकऱ्याला रब्बीचे पीक घेता यावे यासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये इतकी तात्काळ मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीक नुकसान भरपाई:

  • कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ३५ हजार रुपये
  • हंगामी बागायती शेती नुकसान भरपाई हेक्टरी २७ हजार रुपये
  • बागायती शेती नुकसान भरपाई हेक्टरी ३२ हजार रुपये

याव्यतिरिक्त, ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला असेल, त्यांना विमा व्यतिरिक्त हेक्टरी १७ हजार रुपये आणि बागायती शेतीसाठी ५० हजार रुपयांहून अधिक मदत मिळेल.

दिवाळीपूर्वी मदतीचा प्रयत्न आणि केंद्र सरकारचे पाठबळ

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळी सणाच्या तोंडावर जास्तीत जास्त पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही विम्या संदर्भात तातडीने बैठक घेऊन योग्य मदत देण्याबाबत सरकार दबाव आणेल, असे आश्वासन दिले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, तामिळनाडू आणि पंजाबपेक्षाही अधिक मोठे हे पॅकेज आहे आणि केंद्र सरकार देखील महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहून मदत करेल. त्यांनी शेतकऱ्याला टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे, कारण ही मदत अंतिम नाही आणि शासन खंबीरपणे पाठीशी उभे आहे.

जनावरे, घरे आणि दुकानदारांसाठीही भरीव मदत

या पॅकेजमध्ये केवळ पिकांच्या नुकसानीचाच नाही, तर इतर नुकसानीचाही विचार करण्यात आला आहे.

  • जनावरे आणि पशुधन: दुधाळ जनावरांना ३७ हजार रुपयांपर्यंत मदत. कुकुटपालनाला प्रति कोंबडी १०० रुपये मदत.
  • घरे आणि निवारा: नष्ट/पडझड झालेली घरे नव्याने बांधण्यासाठी मदत. डोंगरी भागातील घरांना १० हजार रुपयांची अधिकची मदत.
  • इतर नुकसान: गाळ भरलेल्या विहिरींसाठी ३० हजार रुपये. गोठा आणि दुकानदार यांनाही ५० हजार रुपयांपर्यंत मदत.
  • शिक्षण: विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, दोन हेक्टरच्या एनडीआरएफ नॉर्म्सवरील संपूर्ण भार राज्य सरकारने उचलला आहे आणि काही घटक मदतीपासून वंचित राहिल्यास, त्यांचा समावेश करण्याचीही सरकारची तयारी आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+