कोण आहेत रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज? ज्यांनी पंतप्रधान मोदींना आशीर्वाद दिला
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रचाराचा नारळ फोडला. पंतप्रधान मोदींनी धुळे विधानसभा मतदारसंघातून प्रचार सभेला सुरुवात केली. धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः रत्नसुंदरी सुरीश्वर महाराज यांच्यासोबतचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये महाराज पीएम मोदींच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देताना दिसत आहेत. महाराजांचे कौतुक करताना पीएम मोदींनी लिहिले की, त्यांची समाजसेवा आणि अध्यात्मातील योगदान कौतुकास्पद आहे. त्यांच्या विपुल लेखनासाठीही त्यांची स्तुती केली जाते." चला जाणून घेऊया कोण आहेत रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज?

कोण आहेत रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज?
जैन आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज हे एक प्रतिष्ठित जैन भिक्षू असून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित जैन गुरू आहेत. 5 जानेवारी 1948 रोजी जन्मलेले जैन आचार्य रत्नसुंदरसुरी महाराज हे प्रसिद्ध लेखकही आहेत. जैन आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांनी अध्यात्म आणि धर्मावर 400 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
2017 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित
जैन आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांच्या साहित्यिक आणि अध्यात्मिक योगदानामुळे त्यांना केवळ व्यापक अनुयायीच मिळाले नाही, तर अध्यात्माच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2017 मध्ये भारतातील तिसरा सर्वात प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
In Dhule, met Jainacharya Ratnasundersurishwarji Maharaj Saheb. His contribution towards social service and spirituality is commendable. He is also admired for his prolific writing. pic.twitter.com/GaohGs96Ef
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अन्य दिग्गज व्यक्ती ही त्यांचे चाहते आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी यापूर्वी जैन आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन केलेलं आहे.
पंतप्रधान मोदींनी महाराजांच्या पुस्तकांचे प्रकाशन केले होते
2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी जैन आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांच्या 300 व्या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. या पुस्तकाचे नाव 'मारु भारत, सरु भारत'असे आहे. 2024 च्या सुरुवातीला गृहमंत्री अमित शहा यांनी जैन आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांच्या 400 व्या पुस्तकाचे प्रकाशन केले होते.












Click it and Unblock the Notifications