गाफील राहू नका, शत्रू साम-दाम-दंड-भेद सर्वकाही वापरेल; उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला सल्ला
Maharashtra Assembly Election 2024 : कुणीही गाफील राहू नका. कारण समोरचा शत्रू हार मानणारा नाही. तो साम, दाम, दंड, भेद करेल. सगळ्या उचापत्या करून जिंकण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आपण मशालीसारखे कायम धगधगत राहिलो, तर हा शत्रू आपल्या आसपासही फिरकणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सूचना दिल्या.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर विविध पक्षातील नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यामध्ये भाजपचे रत्नागिरी विधानसभेचे माजी आमदार बाळ माने, कोल्हापूरच्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार के. पी. पाटील व श्रींगोदा विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नगर जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे यांचा समावेश आहे.

शिवसेना संकटानंतर कित्येक पटीने उभी
उद्धव ठाकरे म्हणाले- गत काही दिवसांपासून मातोश्रीत जोरात इनकमिंग सुरू आहे. माझ्यावर नेहमीच घरी बसून काम करत असल्याची टीका होते. जर अवघे जग माझ्या घरी येत असेल तर माझ्याहून मोठा भाग्यवान कोण असेल?, माझे आजोबा संकटाच्या छाताडावर चालून जाण्याचा सल्ला देत असत. ज्या लोकांनी आपला पक्ष चोरला, चिन्ह चोरले, आपल्या मार्गात संकटे उभी केली. पण संकटापूर्वी जेवढी शिवसेना होती, आता संकटानंतर कित्येक पटीने ती उभी राहिली आहे.
भाजपचे रत्नागिरी विधानसभेचे माजी आमदार बाळ माने ह्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र… pic.twitter.com/MiDWMdpVR2
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2024
आपला विजय नक्की झाला
आम्ही नवनवीन सहकारी येतात व भेटतात. हे सर्वजण लढवय्ये आहेत. आपला विजय नक्की झाला आहे. पण कुणीही बेसावध किंवा गाफील राहायचे नाही. समोरचा शत्रू हार मानणारा नाही. आपला शत्रू साम, दाम, दंड, भेद करेल. सगळ्या उचापत्या करून जिंकण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही जागे राहिलात, मशालीसारखे धगधगत राहिलात तर हा शत्रू आपल्या आसपासही फिरकणार नाही. मुळे जागे राहा आणि आपली धगधगती मशाल घरोघरी न्या. हीच मशाल घेऊन आपल्याला भ्रष्टाचार जाळून टाकायचा आहे. आपल्याला आपले शिवशाहीचे सरकार परत आणायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.












Click it and Unblock the Notifications