Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शेवटच्या क्षणाला अजितदादांचा भाजपला चकवा! नवाब मलिकांना दिला AB फॉर्म, अर्जही भरला!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून अखेर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष बाब म्हणजे महायुतीत भाजपकडून त्यांना विरोध केला जात होता. परंतु, अजित पवारांनी त्यांचे कोणाचेही न ऐकता अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणाला एबी फॉर्म देऊन त्यांनी अधिकृतरित्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे अजित दादांनी ऐनवेळी भाजपला चकवा दिला की काय अशी चर्चा रंगली आहे.

मुळात, उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध होता. दहशतवाद्यांशी संबंधित आरोप फडणवीसांनी केले होते. त्यामुळे अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली नव्हती. त्यांच्याजागी सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे सना मलिक यांनी देखील सूचित केले होते की, माझे वडील हे मैदानात उतरणार आहेत. त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, त्यामुळे अजित पवारांनी देखील अगदी तसेच केले आहे.

Ajit Pawar Support Nabaw Malik

नवाब मलिकांची अपेक्षा पूर्ण

काल माध्यमांशी बोलताना देखील नवाब मलिक म्हणाले होते की, पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला तर पक्षाकडून निवडणुकीला सामोरे जाईल. एबी फॉर्म मिळाला नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढणारच आहे.संकटाच्या काळात अजित पवार माझ्या आणि माझ्या कुटुंबासोबत उभे होते. त्यामुळे मी त्यांच्यासोबत राहणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते. पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले होते. त्यानुसार आता त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

AB फॉर्म मिळताच मलिकांचे शक्तीप्रदर्शन

नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एबी फॉर्म दिला असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर नवाब मलिक यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठे शक्तिप्रदर्शन देखील केले. मात्र तोपर्यंत त्यांनी पक्षाच्या वतीने एबी फॉर्म मिळाला असल्याच्या वत्ताला दुजोरा दिला नाही किंवा फेटाळला देखील नाही. मौन पाळत त्यांनी शक्तिप्रदर्शन केले तसेच उमेदवारी दाखल केली.

जनतेच्या आग्रहाखातर अर्ज भरल्याचा दावा

या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने देखील उमेदवार देण्यात आला आहे. मात्र माझ्या विरोधक कोण उमेदवार आहेत, कोण नाही? कोण कोणासोबत आहे? कोणता नेता आहे? हे मला माहित नाही. त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी या मतदारसंघातून निवडणूक लढणार असून माझा विजय निश्चित असल्याचा दावा देखील नवाब मलिक यांनी केला आहे. जनतेच्या आग्रहाखातरच आपण निवडणुकीला सामोरे जात असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+