लाडकी बहीण योजनेचा 'डबल धमाका!'; नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे कधी मिळू शकतील? वाचा सर्व प्रश्नाची उत्तरे
Ladki Bahin Yojana Nov-Dec 3000 rs Joint Installment & e-KYC Update : राज्यातील कोट्यवधी महिला ज्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत, त्यांच्यासाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आचारसंहिता आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे लांबलेला नोव्हेंबरचा हप्ता आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच 'कंबाईन' स्वरूपात दिला जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच महिलांच्या खात्यात थेट ३००० रुपये जमा होऊ शकतात. मात्र, हे पैसे मिळवण्यासाठी ३१ डिसेंबरपूर्वी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महिलांसमोर आहे.

ई-केवायसी प्रक्रियेत होणारा विलंब आणि बँक खाते आधार लिंक नसणे यामुळे अनेक बहिणींचे हप्ते रखडले असून, ते कसे सोडवायचे याबाबतची संपूर्ण माहिती आता समोर आली आहे.
तुमच्या मनातील प्रश्न आणि त्यांची उत्तरे
१) नोव्हेंबरचा हप्ता मिळाला का?
मीडिया रिपोर्टनुसार, बहुतांश लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि त्यानंतरच्या शासकीय प्रक्रियेमुळे नोव्हेंबरचे वितरण रखडले होते.
२) नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार?
नोव्हेंबरचा हप्ता आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच वितरित केला जाणार आहे. नवीन सरकारचे गठन आणि प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर २५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत पैसे खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
३) नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का?
होय, राज्य सरकारने दिलेल्या सुतोवाचानुसार, ज्या महिलांना नोव्हेंबरचे १५०० रुपये मिळाले नाहीत, त्यांना डिसेंबरचे १५०० असे एकूण ३००० रुपये एकत्रित दिले जातील.हप्ते कधी मिळणार? (संभाव्य तारीख)
डिसेंबरचा शेवटचा आठवडा: नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे एकूण ३००० रुपये पात्र महिलांच्या खात्यात २५ ते ३१ डिसेंबर २०२५ या दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे.
निवडणुकांनंतर आता नवीन सरकार पूर्णपणे कार्यरत झाल्यामुळे प्रशासकीय स्तरावर निधी वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.
४) ३००० रुपये कोणाला मिळणार?
ज्या महिलांचे अर्ज 'Approved' आहेत, ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि ज्यांनी ३१ डिसेंबरपूर्वी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केली आहे अशा लाभार्थी महिलांना तीन हजारांचा हप्ता मिळू शकेल.
५) ई-केवायसी (e-KYC) करण्याची अंतिम तारीख काय आहे?
सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत दिली आहे. ज्या महिला हे काम पूर्ण करणार नाहीत, त्यांचे पुढील हप्ते कायमचे बंद केले जाऊ शकतात.
६) योजनेचे हप्ते रखडण्याची प्रमुख कारणे काय?
निवडणूक आचारसंहिता: आचारसंहितेमुळे शासकीय निधीच्या वितरणावर निर्बंध आले होते.
ई-केवायसी अपूर्ण असणे: अनेक महिलांनी अद्याप आधार पडताळणी केलेली नाही.
बँक खाते आधार लिंक नसणे: DBT साठी बँक खाते आधारशी जोडलेले नसणे हे मोठे तांत्रिक कारण आहे.
अर्जातील त्रुटी: काही अर्ज अद्याप 'In Review' किंवा 'Pending' स्थितीत आहेत.
७) ई-केवायसी केल्यानंतर पुढे काय करावे?
ई-केवायसी यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला वेगळे काही करण्याची गरज नाही. तुमचे स्टेटस 'Approved' असल्याची खात्री 'नारीशक्ती दूत' ॲपवर करा. त्यानंतर तुमचे नाव नवीन पात्र यादीत समाविष्ट केले जाईल आणि थेट बँक खात्यात (DBT द्वारे) पैसे जमा होतील.
लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
नोंद घ्या: जर तुमचे बँक खाते बंद असेल किंवा गेल्या ६ महिन्यांपासून व्यवहार झाले नसतील, तर बँक खाते त्वरित सुरू करा, अन्यथा पैसे 'बाउन्स' होऊ शकतात.












Click it and Unblock the Notifications