एकनाथ शिंदेंचा नाना पटोलेंना जबर टोला, म्हणाले- तुम्ही अध्यक्षपद रिक्त केलं अन् आमची गाडी सुरु झाली!
Eknath Shinde's taunts to Nana Patole : "तुम्ही अध्यक्षपद रिक्त केलं अन् आमची गाडी सुरु झाली!" असा जोरदार टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळेच आम्ही सत्तेत आलो अशा अर्थाने त्यांनी हा टोला लगावला. या विधानामुळे महाराष्ट्रातील घडामोडीचे मुळ नाना पटोले असल्याचे सूचक वक्तव्यच त्यांनी केले आहे."
विधीमंडळाच्या अधिवेशनात आज राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून आज निवड झाली. यानिमित्त राहुल नार्वेकर यांच्याबद्दल शुभेच्छापर भाषण देताना एकनाथ शिंदे बोलत होते. त्यावेळी त्यांनी खरपूस समाचार घेत आपल्या खास शैलीत शालीजोडीतून फटके लगावले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधी बाकांवरची संख्या चिंताजनक आहे असे व्हायला नको होते. अध्यक्षांचा अधिकार आहे की, विरोध पक्षनेते पद द्यायचे की नाही. राहुल नार्वेकर सक्षम समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहे. जनतेने डाव्या बाजूची जास्त काळजी घेतली आहे
..तर मी शेती करायला गेलो असतो
एकनाथ शिंदे म्हणाले, मी सभागृहात म्हणालो होतो की, दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून आणेल नाहीतर शेती करायला जाईल. तोही शब्द आम्ही पुर्ण केला. दादा आले त्यात बोनस आला आम्ही २३७ झालो. खऱ्या अर्थाने जनता जनार्धनावर हे असते. लोकशाहीत महायुतीला प्रचंड यश दिले. विकास आणि प्रगतीचे नवे पर्व सुरु झाले आहेत.
2022 मध्ये झाले त्याचे क्रेडिट तुम्हालाच..
2022 मध्ये विधानसभा अध्यक्षपद नानांनी सोडले त्यानंतर जे झाले त्याचे क्रेडिट तुम्हालाच (नाना पटोले) आहे. ते खरे माननारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत. मिडियासमोर जे काही ते बोलतात ते जाऊद्या पण नाना आमचे मित्र आहे आणि त्यांचे आमच्यावर प्रेम आहे. अरे सुरुवात कुठून झाली हे सांगायला नको..असा मिश्किल सवाल करत महाविकास आघाडीवर शिंदेंनी बोचरी टीका केली.
नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे..
एकनाथ शिंदे म्हणाले, नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे..त्यामुळे सुरुवात कुठून झाली हे सांगावेच लागेल कारण आम्ही मुळ विसरत नाही. मुळ विसरता कामा नये. राहुल नार्वेकर साताऱ्याचे जावई आहेत. 20222 मध्ये जे झाले त्यानंतर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष असल्याने राहुल नार्वेकर यांच्यावर जबाबदारी टाकली होती. अशा स्थितीत राहुल नार्वेकर यांनी अत्यंत सखोल अभ्यास करुन सचोटी आणि शांतपणे निर्णय दिला. कितीही दबाव आणला तरी संयम ठेवला आणि न्यायाचा काटा झुकत नाही हे दाखवून दिला. आपण न्याय जो दिला तोच न्याय जनतेनेही दिला आहे.
..ते आरोप करत राहीले आम्ही काम करत राहिलो
एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना कुणाची त्यावर आरोप, प्रत्यारोप होत होते. पायरीवर बसून फक्त आरोप अन् आरोप होत होते. पण आम्ही लक्ष दिले नाही आम्ही काम करणारे काम लोक आहोत. तीन शिफ्टमध्ये आमचे काम सुरु झाले आणि वेगाने झाले, आमचे निर्णय गतीमान झाले. या निवडणुकीत जनता कामाची पोचपावती देईल असा विश्वास आम्हाला होता.
विरोधक हरले की इव्हीएमला दोष देतात
एकनाथ शिंदे म्हणाले, आज बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाणही पराभूत झाले. नाना वाचले..208 मतांनी विजयी झाले. खरं म्हणजे बघा इव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही इथे नसता..असे नाना पटोलेंना उद्देशून शिंदे म्हणाले. तुमच्याबद्दल मी चांगले बोलत आहे. तुम्ही भाषण करताना आम्ही थांबवले नाही. लोकसभेला तुम्हाला यश मिळाले तेव्हा तुम्ही बॅलेट का मागितले नाही तेव्हा बुलेटवर स्वार झाले. तुम्ही हरले की, इव्हीएम असे का असा सवालही त्यांनी केला.












Click it and Unblock the Notifications