Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

...आता कुठे कुठे ठिगळ लावणार! एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली! पण घडलंय काय? वाचा

Eknath Shinde's criticism of Uddhav Thackeray : शिवसेना फुटल्यानंतर असली नकली शिवसेना ते बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वापर्यंत एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षात वाद विवाद अन् शा‍ब्दिक वाकयुद्ध सुरु आहे. अशातच विधानसभा निवडणुकीआधी आणि नंतर महायुतीचा मोठा विजय झाल्यानंतर ठाकरेंच्या पक्षातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग वाढली आहे. या संदर्भात उद्धव ठाकरेंच्या पक्षातील डॅमेज कंट्रोलबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खिल्ली उडवली आहे. आता आभाळच फाटलं कुठे कुठे ठिगळ लावणार असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी 'उबाठा'वर जोरदार प्रहार केला.

मुंबईत एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हिंदुत्व अन् सत्तेसाठी इतर पक्षासोबत जाण्यावरुन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली.

Eknath Shinde s criticism of Uddhav Thackeray

नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे?

एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीसारखा खुर्चीचा अजेंडा नाही तर महायुतीचा अजेंडा हा सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये बदल घडवणे आणि त्यांना न्याय देणे, राज्याला पुढे नेणे आहे. राज्यातील महत्वाच्या पायाभूत सेवा प्रकल्पांचा आढावा घेणारी एकच वॉर रुम आहे. नवीन व़ॉर रुम झालेली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खात्यांचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा कक्ष व़ॉर रुमशी संलग्न आहे. त्यामुळे महायुतीत कोल्ड वॉर नाही तर महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर आहे.

महायुतीमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही

शासन निर्णय 31 ऑक्टोबर 2023 नुसार उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की या राज्याचा विकास करणे हाच महायुतीचा अजेंडा आहे. महायुतीमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षात वैद्यकीय मदतीचे जे अर्ज येतील, त्यांना मदत केली जाईल. यापूर्वी काहीजण मुख्यमंत्री असताना एकदाच मंत्रालयात आले होते याची आठवण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी करुन दिली. महाकुंभसाठी शिवसेनेचे नेते प्रयागराजला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

.. त्यांनी आत्मपरिक्षण करायला हवे

शिवसेना पक्ष हा बाळासाहेबांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. तुम लढो हम कपडा संभालता है या विचारांचा नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. आज शिवसेनेत मोठ्या संख्येने लोक येत आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतोय पण ज्यांना सोडून लोक जात आहेत त्यांनी त्यावर आत्मपरिक्षण करायला हवे, असा सल्ला शिंदे यांनी दिला.

बंद पडलेल्या किंवा दिवाळखोरीत गेलेल्या कारखान्यांच्या कामगारांना लवकरात लवकर थकीत देणी मिळावीत, यासाठी राज्याच्या 'एमआयडीसी'कडून स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+