Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गोरगरीब पित्यांची चिंता मिटली! एकनाथ शिंदे सरकारचे मुलींना मोफत शिक्षण देतेय स्वप्नांना बळ

Eknath Shinde government's free education for girls : शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक होणारी जिल्हे म्हणून मराठवाडा आणि विदर्भ या दोन महसुली विभागातील जिल्ह्यांची ओळख आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, अवकाळी पाऊस आणि शेतमालाला मिळणारा कमी दर यामुळे प्रतिवर्षी कित्येक शेतकरी मृत्यूला कवटाळतात. मुलांचे शिक्षण आणि मुलींची लग्न ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यासमोर मोठी समस्या असते.

पित्याकडे शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून हुशार मुली देखील बाप सांगेल त्या मुलाशी लग्न करतात आणि संसारात रमून जातात. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुलींना मोफत शिक्षण तसेच मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे शेतकरी आणि गोरगरीब पित्यांची मोठी चिंता मिटली आहे.

Eknath Shinde government s free education for girls

मोफत व्यावसायिक शिक्षण देण्याच्या निर्णयाची मुहूर्तमेढ

अगदी सामान्य उत्पन्न असणारा व्यक्ती देखील आपल्या मुलीला उत्तम व्यावसायिक शिक्षण देऊ शकतो अशी व्यवस्था राज्य सरकारने केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कौतुकास पात्र ठरले आहे. मुलीच्या शिक्षणाची फी भरू शकत नसल्यामुळे एका गरीब व्यक्तीने आत्महत्या केली आणि त्याच्या मुलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपली व्यथा कळवली. रात्री दोन वाजता एकनाथ शिंदे यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा केली आणि मोफत व्यावसायिक शिक्षण देण्याच्या निर्णयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्वतः चंद्रकांत दादा पाटील यांनीच हा किस्सा एका जाहीर कार्यक्रमात सांगितला आहे.

मुली भविष्यात स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील

मोफत उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा साडेसात लाख रुपये प्रति वर्षकी ठेवण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीस देखील प्रारंभ करण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली. आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागत असलेल्या तळागाळातील मुलींना व्यावसायिक शिक्षणाचे दरवाजे या योजनेने खुले केले आहेत. या योजनेतून उच्चशिक्षित झालेल्या मुली भविष्यात स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील, कुटुंबाला हातभार लावू शकतील, आणि आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य देखील उज्वल पणे घडवू शकतील.

महाराष्ट्र सरकारकडून मुलींच्या कल्याणासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी विविध योजना राबविण्यात आले आहेत. लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत 18 व्या वर्षापर्यंत एक लाख रुपये मुलीच्या नावावर जमा होतील अशी सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. केंद्राची सुकन्या समृद्धी योजना गेल्या दहा वर्षापासून सामान्य जनांत लोकप्रिय झाली आहे.

मुलींना अर्ध्या तिकीट दरात बस प्रवास योजना

मुलींना अर्ध्या तिकीट दरात बस प्रवास योजना देखील राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याची योजना सरकारने आणली आहे तसेच अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत वार्षिक तीन सिलेंडर मोफत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. खास महिलांसाठी राबविण्यात आलेल्या या योजनांबरोबरच मोफत उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण योजना खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरत असून मुलींच्या भविष्याची काळजी घेणारी योजना म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे.

मुलींना मोफत उच्च शिक्षणाचे जनक अशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख निर्माण झाली आहे त्यामुळेच ग्रामीण भागातील विशेषतः अमरावती, अकोला, संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यातील गोरगरीब तसेच महिला एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+