‘आविष्कार लीडरशिप अवॉर्ड्स २०२६’मध्ये विविध क्षेत्रांतील ४० लीडर्सचा गौरव

'आविष्कार लीडरशिप अवॉर्ड्स २०२६’मध्ये विविध क्षेत्रांतील ४० लीडर्सचा गौरव

Avishkar


पुणे : उत्साह, अभिमान आणि प्रेरणेने भारलेली संध्याकाळ 'सीविक मिरर’ आणि 'पुणे टाइम्स मिरर’तर्फे आयोजित 'आविष्कार लीडरशिप अवॉर्ड्स २०२६’च्या निमित्ताने अनुभवायला मिळाली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, दूरदृष्टी आणि समाजाप्रती योगदान देणाऱ्या

४० लीडर्सचा या पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला.

कोरेगाव पार्कमधील हाॅटेल काॅनरॅडमध्ये गुरुवारी (दि. १३) झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला अभिनेते आणि उद्योजक कुणाल कपूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 'आविष्कार’ म्हणजे शोध. याच भावनेला अनुसरून पुणे आणि परिसरातील नवे निर्माण करणारे, जोखीम पत्करणारे, आरोग्यसेवेत योगदान देणारे, नवकल्पना साकारणारे आणि शांतपणे बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा या पुरस्कारांद्वारे गौरव करण्यात आला. नेतृत्व हे केवळ एखाद्या विशिष्ट व्यवसायापुरते किंवा क्षेत्रापुरते मर्यादित नसते, तर धैर्य, नवकल्पना, बांधिलकी आणि अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याची जिद्द जिथे दिसते, तिथे नेतृत्व उदयास येते, हा संदेश या सोहळ्याने दिला.

पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाणी अत्यंत उत्साही आणि आनंदाचे वातावरण होते. 'सीविक मिरर’ आणि 'पुणे टाइम्स मिरर’ यांच्या वतीने आयोजित या पुरस्कारांचे प्रायोजक इंदिरा युनिव्हर्सिटी होते. 'एमआयडीसी’ आणि 'महाजनको’ हे सह-प्रायोजक, 'लोकमान्य’ वित्तीय भागीदार, तर 'रुबी हाॅल क्लिनिक’ आणि 'नोबल हाॅस्पिटल’ आरोग्य भागीदार तर निपाॅन इंडिया आणि कोहिनूर ग्रुप हे भागीदार होते.

या प्रसंगी 'सीविक मिरर’ आणि 'पुणे टाइम्स मिरर’ तसेच लेक्सिकॉन ग्रुपचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डाॅ. पंकज शर्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. इंदिरा युनिव्हर्सिटीचे मुख्य विपणन अधिकारी तसेच इंदिरा युनिव्हर्सिटी आणि इंदिरा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे शैक्षणिक सल्लागार प्रा. चेतन वाकलकर, इंदिरा युनिव्हर्सिटी ॲंड प्रोजेक्ट्सचे (एससीइएस) कार्यकारी संचालक शार्दूल गांगल, रुबी हाॅल क्लिनिकच्या संचालक नताली ग्रँट नंदा, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, नोबल हाॅस्पिटलचे संचालक डॉ. एस. के. राऊत, कोहिनूर ग्रुपचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल, निपाॅन इंडिया म्युच्युअल फंड, पुणेचे वरिष्ठ प्रादेशिक प्रमुख विनय नरसिंहन आदी मान्यवर उपस्थित होते.

आविष्कारच्या माध्यातून दिलेले अ‍ॅवार्ड

- डॉ. प्रणव महादेवकर - एआय टेक्नाॅलाॅजी अ‍ॅण्ड एक्सलन्स अ‍ॅवाॅर्ड

- अनुराग गोयल - यंग आंत्रप्रेनर - रिअल इस्टेट

- शीथा आणि अमजद खान - बेस्ट पीआर अ‍ॅण्ड कम्युनिकेशन्स एंटरप्राइज

- डॉ. विक्रमादित्य साळवी - एक्सलन्स इन प्लास्टिक, काॅस्मेटिक अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी अ‍ॅण्ड एइस्थेटिक हेल्थकेअर

- अनुजा नवाथे आणि अनीश नवाथे - बेस्ट बिझनेस अ‍ॅडव्हायजरी फर्म

- डॉ. शैलेश पाटील - एक्सलन्स इन हेल्थकेअर अ‍ॅण्ड लाइफ सायन्सेस

- डॉ. हिमांशू अजवानी, डॉ. अजवानी डेंटल सेंटर्स - डेंटल वेलनेस पायोनिअर

- राजेश गुर्जर, स्क्वेअर एफटी - एक्सलन्स इन रिअल इस्टेट अ‍ॅण्ड अर्बन डेव्हलपमेंट

- अमोल कायगावकर, संस्थापक, जान्हवी ज्वेलर्स - बेस्ट लिगसी बिझनेस

- डॉ. प्रथमेश राऊत, बेस्ट हेल्थकेअर इनोव्हेटर

- रणजित नातू - बेस्ट फायनान्शियल सर्व्हिस आंत्रप्रेनर

- सायली मराठे - बेस्ट विमेन आंत्रप्रेनर - डिझाइन अ‍ॅण्ड लाइफस्टाइल

- स्नेहा अग्रवाल, ऑरा - एक्सलन्स इन एज्युकेशन अ‍ॅण्ड एडटेक

- डॉ. समीर सोनार, ग्रुप डायरेक्टर, न्यूक्लियर मेडिसिन, पीईटी सीटी अ‍ॅण्ड थेरानाॅस्टिक्स - एक्सलन्स इन मेडिकल टेक्नाॅलाॅजी इनोव्हेटर

- अ‍ॅड. अजिंक्य मधुकर मिरगळ - बेस्ट लीगल आंत्रप्रेनर

- नेहा सेठी, अयात्री - द सोल कनेक्ट - बेस्ट अल्टरनेटिव्ह वेलनेस ब्रँड बिल्डर

- उम्मेआयमन अन्सारी - बेस्ट एज्युकेशन आंत्रप्रेनर

- आरव दानानी - यंग आंत्रप्रेनर ऑफ द ईअर

- नागेश शर्मा, मेरा लोन डाॅक्टर कन्सल्टन्सी - बिझनेस एक्सलन्स अ‍ॅवाॅर्ड

- वैष्णव तापकीर, २४ टूरिस्ट हाॅलिडेज - एक्सलन्स इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड टूरिझम

- जान्हवी नीरज भांगे, व्हिरेव्हा फूड्स- बेस्ट फूड अ‍ॅण्ड न्यूट्रिशन व्हेंचर

- ओरिगो व्हेंचर्स - बेस्ट व्हेंचर बिल्डर

- कैझाद श्रॉफ - बेस्ट एंटरप्राइज टेक्नाॅलाॅजी आंत्रप्रेनर

- रणजित एम. आणि अनिल भट - बेस्ट आयटी एंटरप्राइज

- वीरेंद्र झांब, क्लीन अर्थ एनर्जी सोल्युशन् इंडिया प्रा. लि. - ग्रीन एनर्जी पायोनिअर

- अनिल शिंपी, एस. के. ऑकाॅस्टिक्स - बिझनेस एक्सलन्स अ‍ॅवाॅर्ड

- प्रदीप दीक्षित - इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पाॅन्सिबिलिटी (आयएसआर) प्रोजेक्ट्स

- संदीप जोशी - बेस्ट इनोव्हेशन आंत्रप्रेनर

- एनलाइट मेटल्स प्रा. लि.,- बेस्ट नेक्सट जेन मॅन्युफॅक्चरिंग आंत्रप्रेनर

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+