औरंगजेबबद्दल छत्रपती संभाजी महाराजांची खरी ठरलेली भविष्यवाणी कोणती होती? जाणून घ्या

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची चर्चा अजूनही कमी झालेली नाही. सध्या बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतोय. या सिनेमामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातून संभाजी महाराजांच्या अनेक माहित नसलेल्या गुणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबासाठी एक भविष्यवाणीही केली होती. विशेष म्हणजे ती भविष्यवाणी तंतोतंत खरीही ठरली होती. आता ती भविष्यवाणी काय होती? व ती कशामुळे केली होती? तेच आपण पहूयात...

Aurangzeb s death prediction

ओरंगजेबाला जिद्द नडली

ऑरंगजेबाची राजधानी खरं तर दिल्ली होती. मात्र त्याला संपूर्ण भारतावर राज्य करायचं होतं. त्यानं भारतातला अनेक भाग जिंकलाही होता. मात्र मराठ्यांचा दख्खन काबिज करण्याची त्याची जिद्द होती. त्याने त्याचे अनेक मोठमोठे सरदार दख्खन जिंकण्यासाठी पाठवले मात्र त्यात त्याला यश आले नाही. अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने स्वतः दख्खनला येण्याचा निर्णय घेतला. येथे राहून दख्खन जिंकून अशी त्याची अपेक्षा होती.

संभाजीराजांनी पाठवले पत्र

दख्खनचा ताबा मिळवण्यासाठी औरंगजेब औरंगाबाद येथे आला. तेथून त्याने दख्खन जिंकण्याची तयारी सुरु केली. संभाजी महाराजांना हे सगळं समजलं, तेव्हा त्यांनी थेट दिल्लीला औरंगजेबाच्या मुलीला पत्र लिहिलं. छत्रपती संभाजी महाराजांनी त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की, 'औरंगजेब जर त्याच्या जिद्दीवर अडून बसला तर, दिल्लीत पुन्हा परतू शकणार नाही. त्याच्या हट्टीपणामुळे त्याची दख्खनमध्येच कबर खोदली जाऊ शकते.'

महाराजांची भविष्यवाणी ठरली खरी

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली ही भविष्यवाणी अगदी खरी ठरली. मुघल आणि मराठ्यांच्या झालेल्या युद्धात औरंगजेबाचा पराभव झाला. त्यानंतर दिल्लीत परतत असताना त्याचा मृत्यू झाला. लेखक विश्वास पाटील यांच्या मतानुसार, औरंगजेबाने दख्खनवर ४ लाख प्राणी आणि ५ लाख सौनिकांसोबत आक्रमण केलं होतं. पण छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला एकही किल्ला जिंकू दिला नाही आणि कायम त्याचा पराभव केला.

औरंगजेबाचा नगरमध्ये मृत्यू

३ मार्च १७०७ रोजी औरंगजेब दख्खनहून दिल्लीला परतत असताना त्याचा अहमदनगर येथील भिंगारमध्ये मृत्यू झाला. औरंगजेबाचा मृतदेह दिल्लीत नेण्यात आला नाही. औरंगजेबाची अशी इच्छा होती की त्याची कबर दिल्लीला नाही तर खुल्ताबादला करावी. कारण खुल्ताबाद येथे औरंगजेबाचे गुरु शेख जैनुद्दीन साहिब ज्यांचा दर्गा आहे. त्याच्याजवळच आपली कबर व्हावी, अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याचा मृतदेह दिल्लीला न नेता तो खुल्ताबादला दफन करण्यात आला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+