Vivek Johnson : बीडचे नवे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन कोण आहेत? मुळ कुठले, आधी कुठे भुषवले पद
Beed News Who is the new collector Vivek Johnson : गेल्या काही काळात खून आणि इतर घटनांमुळे बीड जिल्हा देशात चर्चेत आहे. अशातच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, अशातच राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यामध्ये संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून विवेक जाॅन्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील वाळूतस्करी, त्यासंबंधित गुन्हेगारी आणि जमीन घोटाळ्यांसंबंधी अनेक तक्रारी आहेत. या सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवून त्या नेस्तनाबूत करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांच्यावर आहेत. हे नवीन जिल्हाधिकारी कोण आहेत याबद्दल आपण माहिती घेऊया.

कोण आहेत विवेक जाॅन्सन
विवेक जाॅन्सन हे मूळचे केरळमधील मलप्पुरम् जिल्ह्यातील आहेत, त्यांना वयाच्या 31 व्या वर्षी महाराष्ट्र केडर नियुक्त करण्यात आले होते. काही वर्ष त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले आणि ऑक्टोबर 2022 मध्ये ते चंद्रपूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर आता त्यांना बीड येथे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
विवेक जाॅन्सन यांना मिळाला 'हा' पुरस्कार
विवेक जाॅन्सन यांना चंद्रपूर जिल्ह्यातील उल्लेखनिय काम केल्याबद्दल आयएएस प्राॅमिसिंग श्रेणीतील महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे.
विवेक जाॅन्सन् यांच्याबद्दल खास गोष्टी
- आयएएस विवेक जाॅन्सन यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट केला आहे, यासह ते चंद्रपूरच्या तरुणांचे हिरो बनले आहेत.
- बदलीआधी विवेक जाॅन्सन हे चंद्रपूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते.
- विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करुन आवड निर्माण व्हावी तसेच खेळण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी चंद्रपुरात त्यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे.
- विवेक जाॅन्सन यांनी नागपूरच्या खुल्या विज्ञान केंद्राला भेट दिली तेथून त्यांना विज्ञान आणि खेळातील उपक्रमाबद्दल प्रेरणा मिळाली होती.
- चंद्रपुरमध्ये त्यांनी 28 ओपन सायन्स पार्क उभारले आहेत. साडे सहा हजार स्क्वेअर फूल परिसरात हे सायन्स पार्क आहे.
- चंद्रपूर जिल्ह्यात त्यांनी 75 क्रिडा संकुलं उभारण्यात मोलाची भूमिका साकारली.
हेही वाचा : Beed News khokya bhai : ऐन होळीत बीडमध्ये खळबळ! खोक्याचे घर जाळले, कुटुंबीयांना मारहाण झाल्याचा आरोप
हेही वाचा : Santosh Deshmukh Murder Case Timeline: संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली? पूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर
हेही वाचा : Walmik Karad : बीड जेलमधील मारहाणीत वाल्मिक कराडचं नाव वगळलं? चर्चा रंगली! गिते गँगचे चौघे हर्सूलला












Click it and Unblock the Notifications