Walmik Karad : बीड जेलमधील मारहाणीत वाल्मिक कराडचं नाव वगळलं? चर्चा रंगली! गिते गँगचे चौघे हर्सूलला
Walmik Karad's name dropped in Beed Jail assault case : बीड जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाण प्रकरण सध्या गाजत आहे. वाल्मिक कराड कराड व महादेव गीते समर्थकांच्या वाद झाल्याचे बोलले जात असून वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचे सांगितले जात होते.
आता कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून सुदीप सोनवणे व राजेश वाघमोडेंवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे कारागृह प्रशासनाच्या तक्रारीत वाल्मीक कराड याचे नाव मात्र नाही, त्याचा उल्लेख टाळला की, मुळातःच या प्रकरणात त्याचा सहभाग नाही हे गुलदस्त्यातच आहे.

कोण आहे महादेव गिते?
बापू आंधळे खून प्रकरणात महादेव गीते हा आरोपी आहे. त्याच्यासह राजेश वाघमोडे, राजाभाऊ नेहरकर, मुकुंद गीते यांच्यासह बनावट नोटा प्रकरण व गोळीबारातील आरोपी अक्षय आठवले (Akshay Athawale) व त्याचे सहकारी याच कारागृहात होते. संतोष देशमुख हत्या अपहरण प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड, दर्शन घुले व इतर आरोपी बीड कारागृहातच आहेत.
काय झाला होता वाद आणि मारहाण?
सोमवारी महादेव गीतेच्या हत्येच्या प्रयत्नातील आरोपी सुदीप सोनवणे व बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी राजेश वाघमोडे यांच्यात हाणामारी झाली. ही मारहाण वाल्मीक कराड सुदर्शन घुले यांना झाली आणि ती महादेव गिते टोळीकडून झाल्याची चर्चा होती. या वादानंतर आता गिते गँगच्या चौघांना हर्सुल कारागृहात स्थलांतरित केले गेले आहे.
काय झाली तक्रार दाखल?
मारहाण प्रकरणात कारागृह प्रशासनाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये कारागृह शिपाई संतोष नवले यांनी तक्रार दिली. त्यानुसार, शिवाजी नगर पोलिस ठाण्यात सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या तक्रारीत वाल्मिक कराड याचे नाव नाही, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे.
हेही वाचा : वाल्मिक कराड- सुदर्शन घुलेवर कारागृहात झाला हल्ला? नेमका काय होता 'गेम'; तुरुंग प्रशासन म्हणतंय...
वाल्मिक कराड हा राज्यातील माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे असे म्हटले गेले. राजकीय आश्रय असल्याने वाल्मिक कराडला या प्रकरणी दूर ठेवले गेले असा आरोपही केला जात आहे. यासंदर्भात वाल्मिक कराड याचा या प्रकरणाशी खरचं संबंध आहे का हे मात्र, अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे त्याचे नाव तक्रारीत आले नसावे अशीही चर्चा आहे.
हेही वाचा : Dhananjay Munde resigns : अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा; वाल्मिक कराडशी हितसंबंध भोवले!












Click it and Unblock the Notifications