Dhananjay Munde resigns : अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा; वाल्मिक कराडशी हितसंबंध भोवले!
Dhananjay Munde resigns : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुन हत्याप्रकरणी विरोधकांच्या मोठ्या मागणीनंतर अखेर मंत्री धनंजय मुंडे यांची गच्छंती टळली नाही. धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर हे प्रकरण गाजले असून या हत्येचे काही फोटो आरोपपत्रातून समोर आले. या फोटोत संशयित आरोपींनी क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे दिसले, त्यानंतर या हत्येतील संशयित आरोपीशी संबंध असल्याच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा विरोधक मागत होते. काल 3 मार्च 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाले.

अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काल बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे हेही होते, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे सांगितले. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा मी स्विकारला असून त्यांना मी पदमुक्त केल आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वाल्मिक कराड यांच्याशी असलेले हितसंबंधामुळे धनंजय मुंडेंवर राजीनामा देण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडूनही राजीनामा देण्यासाठी जोरकस मागणी केली जात होती.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2025
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच,…
धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला - मुख्यमंत्री फडणवीस
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुढील कारवाईसाठी हा राजीनामा राज्यपालांना पाठवला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवन परिसरात दिली. बीड जिल्ह्यातील मसाजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुंडे यांच्या निकटवर्तीयांची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे विरोधक तसंच भाजप आमदार सुरेश धस अनेक दिवसापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांचा आक्रमक सूर
विरोधकांनी आज मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली. यादरम्यान, महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले होते. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी ठिय्याही दिला होता. त्यानंतर काही वेळातच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे वृत्त आले.












Click it and Unblock the Notifications