Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Beed News khokya bhai : ऐन होळीत बीडमध्ये खळबळ! खोक्याचे घर जाळले, कुटुंबीयांना मारहाण झाल्याचा आरोप

Beed News khokya Bhai : गुंडगिरी, मारहाण आणि प्राण्याची शिकार केल्याचा आरोप असलेला खोक्या उर्फ सतीष भोसलेचे घर पेटवण्यात आले आहे. ही घटना होळी सण सुरु असतानाच घडली. दरम्यान दुसरीकडे खोक्या उर्फ सतीष भोसलेला प्रयागराज येथून ताब्यात घेण्यात आले असून तेथून बीडमध्ये आणण्याच्या दरम्यानच ही घटना घडली.

बीडमध्ये खळबळ

खोक्याचे घर काही अज्ञातांनी जाळले असल्याची घटना समोर आल्यानंतर बीडमध्ये खळबळ उडाली आहे. यावेळी खोक्याच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण झाल्याचेही सांगण्यात येत आहे, तसा आरोपही करण्यात आला आहे. प्रयागराजमधून अटक केलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला आज बीडमध्ये आणले जात आहे.

Beed News khokya Bhai

काय आहेत खोक्यावर गुन्हे?

खोक्या उर्फ सतीष भोसले याच्यावर गुंडगिरी, मारहाण, प्राण्यांची शिकार करणे आदी विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी खोक्याने प्रयागराजला पलायन केले. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांनी प्रयागराजमध्ये खोक्याच्या मुसक्या आवळल्या.

अतिक्रमणामुळे वनविभागाने खोक्याचे घर पाडले

गुरुवारी वनविभागाने खोक्याचे घर पाडले. वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या मुद्यावरूनही कारवाई करण्यात आली. वन विभागाने पाडलेल्या सतीश उर्फ खोक्याच्या घराची अज्ञाताने आग लावली. वन विभागाने हे घर अतिक्रमित ठरवले होते. त्यानंतर पाडकाम करण्यात आले. अतिक्रमणात पाडलेल्या घराला अज्ञाताने आग लावून दिली.

यावेळी कुटुंबीयांना मारहाण झाली असल्याचा आरोप खोक्याच्या कुटुंबातील सदस्यांनी केला. जाळपोळीची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

कोण आहे खोक्या उर्फ सतीष भोसले कशामुळे झाली अटक

खोक्या भोसले याने मारहाण केली होती, या प्रकरणी त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला, दरम्यान, त्याच्या घरावर वनविभागाने धाड टाकली होती. त्यावेळी धारदार शस्त्रं, जाळी, वाघूरसह आणि अनेक गोष्टी वनविभागाला आढळून आल्या. प्राण्यांचे मांस देखील पोलिसांना आढळले. खोक्याने शेकडो वन्य जीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. तसेच, हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा दावा त्यांनी केला. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी या गावातील डोंगर परिसरामध्ये मोठा हरणांचा कळप आहे, आणि या कळपाला संपवण्याचे काम सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या गँगने केले आहे, असा आरोप आहे.

बसने खोक्या गेला होता प्रयागराजकडे

महाराष्ट्र पोलिसांच्या माहितीवरून प्रयागराज पोलिसांनी सतीश भोसले यांना अटक केली. पोलिस चौकशीदरम्यान सतीश भोसले यांनी सांगितले होते की ते औरंगाबादहून बसने प्रयागराजला आले होते. त्याला प्रयागराजहून अयोध्येला जायचे होते. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात 29 वर्षीय सतीश भोसले यांच्याविरुद्ध आठ गुन्हे दाखल आहेत. मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार सतीश भोसले उर्फ ​​खोक्या याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि एन डीपीएस कायद्याचे गुन्हे दाखल आहेत. सतीश भोसले यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी साठ हजार रुपये रोख आणि एक मोबाईल फोन जप्त केला.

खोक्या प्रसिद्धीच्या झोतात

मारहाणीच्या एका प्रकरणानंतर सतीश भोसले प्रसिद्धीच्या झोतात आला. वन विभागाच्या छाप्यादरम्यान, आरोपी सतीशच्या घरातून अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या. सतीशवर वन्य प्राण्यांना मारून त्यांचे अवशेष घरी ठेवल्याचाही आरोप आहे. खोक्या भोसले हा भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा एक पदाधिकारी असल्याचेही सांगितले जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+