Santosh Deshmukh Murder Case Timeline: संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली? पूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर
Santosh Deshmukh Murder Case Timeline : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निर्घुणपणे करण्यात आली. यानंतर पोलिस तपासात हत्येचे काही फोटो समोर आले. तपासयंत्रणांनी आरोपत्र न्यायालयात दाखल केले. यानंतर 3 मार्च रोजी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले. अत्यंत निर्घुणपणे त्यांची हत्या केल्याचे यातून स्पष्ट झाले.
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे फोटो व्हायरल होताच राज्यात संतापाची मोठी लाट उसळली. यानंतर बीड बंदची घोषणा करण्यात आली. बीड जिल्ह्यात वातावरण तापले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मंत्री आणि नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत धनंजय मुंडे हेही होते. बैठकीत राजीनामा द्या, असे आदेश धनंजय मुंडेंना देण्यात आल्यानंतर हा आदेश प्रमाण माणून शेवटी धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा दिला.

या घटनेविषयी खुद्द राज्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिले आणि सभागृहाला इत्यंभूत माहिती देत विरोधकांच्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. या घटनेची टाईमलाईन आपण जाणून घेऊया.
Santosh Deshmukh Murder Case Timeline :असा आहे घटनाक्रम
- 28 मे 2024 - पवनचक्की प्रकल्पासाठी एक कंपनी जमीन ताब्यात घेणार होती. पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले. त्या बदल्यात 2 कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली. पुन्हा काम सुरू करण्याच्या बदल्यात ही खंडणी मागितली गेली.
- 6 डिसेंबर 2024 - सुदर्शन घुले यांच्या नेतृत्वाखाली काही लोक मस्साजोग गावात असलेल्या कंपनीच्या साईटवर पोहोचले. या लोकांनी तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांवर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.
- सरपंच संतोष देशमुख यांना याबद्दलची माहिती मिळताच ते देखील काही ग्रामस्थांसह घटनास्थळी पोहोचले. यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. यानंतर सुदर्शन घुलेला अटक होऊन त्याची जामिनावर सुटका झाली.
- 9 डिसेंबर 2024 - 9 डिसेंबर 2024 ला संतोष अण्णा आपल्या वाहनातून गावी जात होते, त्यावेळी ते एकटेच होते. पंपावर ते थांबले तिथे त्यांचे आतेभाऊ होते ते त्यांना दिसले आणि अण्णांनी त्यांना बोलावले आणि सोबत चल म्हणाले. दोघे निघाले त्यावेळी टोलनाक्याजवळ काळ्या रंगाची स्काॅर्पिओ आणि इतर गाड्या वाट पाहत होत्या. त्यानंतर त्यांची गाडी वेगाने गेले तेव्हा वाट पाहणाऱ्यांनी त्यांच्या गाडीची काच फोडली. त्यानंतर अण्णांना बाहेर काढले आणि त्यांनी स्वतःच्या गाडीत टाकून मारहाण व नंतर अपहरण केले. तारा गुंडाळून मारहाण झाली. पाठीवर व्रणही दिसत आहेत. त्यावेळी असे लक्षात आले की, यात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी हल्लेखोर पळाले. यानंतर काही तासांनी सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला.
- 10 डिसेंबर 2024 - संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग गावातील लोकांनी हत्येचा निषेध केला. त्यांच्या मोर्चात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी याला पाठिंबा दिला.
- 11 डिसेंबर 2024 - पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल, तपास सुरू
- संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या प्रकरणी सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी म्हणजेच मकोका अंतर्गत या प्रकरणी सुमारे 1400 पानांचे दोषारोपपत्र दाखल, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून विशेष मकोका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
- बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून हे प्रकरण लावून धरले तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील राखेचा व्यवहार, वाल्मीक कराड ते धनंजय मुंडे कनेक्शन या सर्वांची कागदपत्रे समोर आणली.
- 31 डिसेंबर 2025 रोजी संशयित आरोपी वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले.
- धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना दुसरीकडे भगवान गडाचे महंत शास्त्री नामदेव शास्त्री यांचा धनंजय मुंडेंना पाठींबा जाहीर, नामदेव शास्त्रींवर यामुळे टीका.
- 26 फेब्रुवारी 2025 रोजी संतोष देशमुख हत्याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथून आरोपी पळून गेले होते. त्यावेळी वाशी येथील पारा चौकातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. हे 9 डिसेंबर 2024 चा संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांचे सीसीटीव्ही फुटेज आहे.
- संतोष देशमुख यांच्या हत्येचे आणि त्यांना मारहाण करतानाचे 8 फोटो आणि 15 व्हिडीओ समोर आले. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम या फोटोतून उलगडला आहे. या हत्यावेळेचे सर्व व्हिडीओ आणि फोटो पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले आहेत.
- हे फोटो समोर आल्यानंतर 3 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल दबाव वाढला. यानंतर रात्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक पार पडली.
- या बैठकीनंतर आज सकाळी 4 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पीएकडून सागर बंगल्यावर राजीनामा पाठवला, स्वीय सहायकांनी तो मुख्यमंत्र्यांकडे सोपवला.
या गुन्ह्यापुर्वी काय घडलं होतं...
29 नोव्हेंबर 2024 ला केज ठाण्यात तक्रार दाखल झाली. त्यात सुनील शिंदे यांना वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटेंच्या मोबाईलवरुन धमकी दिली. तसेच सुदर्शन घुलेने कार्यालयात येत धमकावले असेही तक्रारीत नमूद आहे.












Click it and Unblock the Notifications