बच्चू कडूंचं मोठं विधान, म्हणाले, मी विधानसभा लढणार नाही, कारण...
मुंबई : आमच्या काही मागण्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, दिव्यांगांचे प्रश्न आहेत. त्या मागण्यांचे निवेदन मी १९ तारखेला महायुतीला देणार आहे. त्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या तर मी माझी जागा महायुतीला देऊन टाकणार आहे.

विधानसभा निवडणुकीतून माझी त्यावेळी माघार असणार आहे, असे मोठे विधान आज प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले. या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू...
पत्रकारांसमोर बोलताना बच्चू कडूंनी आपली आगामी रणनीती सांगितली. ते म्हणाले, मी महायुती मध्ये नाही. तुम्हाला कोणी सांगितलं की मी महायुतीमध्ये आहे..? माझ्या शेतकरी, कष्टकरी, शेजमजूरांबाबतच्या काही मागण्या आहेत. त्या मागण्या मी १९ तारखेला सरकारसमोर मांडणार आहे. सरकारने त्या मागण्या मान्य केल्या तर माझी विधानसभा निवडणुकीतून माघार असणार आहे. मी माझी जागा महायुतीला देऊन टाकील. आमची तिसरी आघाडी नाही. परंतु मागण्या मान्य झाल्या नाही तर, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू, असे म्हणत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले.
काय आहेत मागण्या?
पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमीमधून करावी, 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांच्या शेतमालास भाव द्यावा, दिव्यांगांना दरमहिना मानधन द्यावे, गरीब व श्रीमंतामधील विषमता वाढत चालली आहे, त्यात समानता आणावी आदी मागण्या आम्ही १९ तारखेला सरकारकडे करणार आहोत, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. आम्ही सरकारला निवेदन देणार असल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं.
राजू शेट्टींही होणाार सहभागी?
महाविकास आघाडी व महायुती हे दोन्ही घटक पक्ष छोट्या पक्षांना संपवण्याचे काम करत आहेत. लोकसभेमध्ये मला उबाठा गटाने पाठिंबा दिला नाही. आम्ही छोटे-मोठे पक्ष एकत्रित येऊन एक नंबरची आघाडी करू. बच्चू कडू हे माझे चांगले मित्र आहेत ते जर आले तर त्यांच्यासोबत आम्ही आघाडी करू, असे स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. छोट्या- मोठ्या पक्षांना किंवा संघटनांना संपवायचे मोठ्या पक्षांची पर्याय व्यवस्था तयार करून ठेवण्याची प्रवृत्ती आहे. छोट्या मोठ्या पक्षांची अशीच कुचंबना होत असते. त्यामुळे विधानसभेला बच्चू कडू आणि मी एकत्रित येऊ शकतो राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications