Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

केंद्र, राज्यात भाजप सरकार मग शिवरायांचा पुतळा का झाला नाही?- संभाजीराजेंचा शिंदे, मोदी सरकारला सवाल

Arabian Sea Shivsmarak Case : अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काय झाले भाजपचे केंद्रात आणि राज्यात सरकार आहे त्यांनीच जलपूजन आणि पुतळा उभारण्याची घोषणा केली समिती स्थापन केली पण शिवस्मारक कुठे आहे शिवरायांचा पुतळा कुठे आहे..? असा सवाल स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला केला आहे.

शिवस्मारकाचे काम पाहण्यासाठी जात असतानाच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवले त्यावेळी त्यांनी सरकारला सवाल केला,, आज तिथे काय झाले हे मलाच माहीत नाही. मला तिथे काय चालले हे बघण्याचा अधिकार नाही का, मी गुन्हेगार आहे का असा सवाल केला.

Arabian Sea Shivsmarak Case

शिवस्मारकाच्या मुद्यावरुन संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झाले असून शिवस्मारकाचे काम कुठपर्यंत आले हे पाहण्यासाठी ते गेट वे ऑफ इंडियावर पोहचले. तत्पुर्वी त्यांनी पुणे - ते मुंबई अशी रॅली काढली. संभाजीराजांनी गेट वे ऑफ इंडियावर यावेळी शिवभक्त आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.

छत्रपती शिवरायांचा अरबी समुद्रातील पुतळ्याच्या कामाचे जलपुजन 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर या पुतळ्याचे कामकाज सुरु आहे पण अद्यापही ते पुर्ण झाले नाही. ते काम किती झाले हे पाहण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आज हाती मोहीम घेतली आहे.

दरम्यान आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहेत. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली. यानंतर आंदोलकांना आझाद मैदानात नेण्यात आले आहे. अरबी समुद्रात जाण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार ठाम असतानाच पोलिसांनी त्यांना अडवले. पोलिस आणि कार्यकर्त्यांत झटापट यावेळी झाली.

दडपशाही केल्यास आम्ही निर्णय घेऊ

दडपशाही पोलिस जर करत असेल तर आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल असा इशारा यावेळी संभाजीराजे यांनी दिला, आम्हाला कुठलाही कायदा हातात घ्यायचा नाही, कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊ नका ते आरोपी नाही असेही यावेळी संभाजीराजे यांनी म्हटले. तर पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती असेही सांगण्यात येत आहे.

संभाजीराजे म्हणाले, हे प्रतिकात्मक आंदोलन म्हटलं तरी चालेल पण हे आंदोलन नाही. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले आहे. खरी परिस्थिती ही आहे की, रायगड किल्ल्यावर रायगड प्राधिकरण स्थापन करण्यास मी सरकारला भाग पाडलं. हे स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात झाले. माझी भावना प्रामाणिक आहे.

संभाजीराजे यांनी म्हणाले, मुंबईत एक मोठे स्मारक छत्रपती शिवरायांचे स्मारक व्हावे ही पुढाऱ्यांची इच्छा होती. ही इच्छा कुणी केली तर राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी.. ते हा खर्च द्यायला तयार होते. त्यावेळी राजकीय परिस्थिती काय झाले या खोलात मला जायचे नाही.

नंतर सुशील कुमार शिंदे यांनी घोषणा केली, त्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, त्यानंतर भाजप आणि नंतर 2016 ला मुंबई मनपाच्या निवडणुकीआधी देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते जलपूजन झाले अर्थात परमिशन सर्व होत्या असे म्हणायला हवे. कारण सर्व मंजुरीनंतरच पंतप्रधान अशा कार्यक्रमाचे उद्घाटन करतात. पण पुढे काहीच झाले नाही. मविआचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो की, महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही मागण्या केल्या पण त्यांनी पर्यावरण खात्याच्या नियम अटी दाखवल्या.

जलपूजन झाले स्मारकस्थळी काय झाले सांगा-संभाजीराजे

संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे. माझा प्रश्न आहे की, त्यांचे केंद्रात आणि राज्यात सरकार आहे त्यांनीच जलपूजन आणि पुतळा उभारण्याची घोषणा केली समिती स्थापन केली पण आज तिथे काय झाले हे मलाच माहीत नाही. मला तिथे काय चालले हे बघण्याचा अधिकार नाही का...असा सवालही त्यांनी केला. आम्ही दुर्बिणने बघू दुरुन बघू नियम पाळू कायद्या पाळू पण तरीही आम्हाला जर ताब्यात घेत असाल तर ही दडपशाही नाही का..आम्ही गुन्हेगार आहोत का असा सवाल त्यांनी केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+