Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

US प्रेसिडेंट ट्रम्प यांचा टॅरिफ धोरणाबाबत मोठा निर्णय, भारताच्या लघु-मध्यम उद्योगांना बसणार फटका!

US President Donald Trump big decision tariff policy : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने नवनवीन घोषण करू लागले आहेत. आता अमेरिका भारताच्या वस्तूंवर देखील परस्पर शुल्क लादणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही लवकरच परस्पर शुल्क (Reciprocal tariff) लादणार आहोत. जे आमच्याकडून शुल्क आकारतात, आम्हीही त्यांच्यावरही शुल्क आकारू. मग ती कंपनी असो किंवा चीन आणि भारतासारखा देश असो. हे केवळ निष्पक्ष राहण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या नव्या धोरणामुळे भारतातीतल लघु व मध्यम उद्योगव्यवसायांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर कर लादण्याबाबत मोठे विधान केले आहे. ट्रम्प म्हणाले आहेत की, ते आमच्यावर कर लादतात, आम्ही त्यांच्यावर कर लादू. डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की भारत अमेरिकन वस्तूंवर जे शुल्क लावतो तेच शुल्क अमेरिका भारतावर देखील लादेल. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकेच्या टॅरिफ धोरणात आमूलाग्र बदल करत आहेत. आक्रमक व्यापार धोरण स्वीकारत, ट्रम्प यांनी अनेक वेळा सांगितले आहे की ते कोणत्याही देशावर अमेरिकन वस्तूंवर जो कर लावतात तोच कर लावतील. ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर परस्परक शुल्क लादण्याचा निर्णय घेतला.

US President Donald Trump

मोदी-ट्रम्प भेटीतूनंतरही तोडगा निकालाच नाही

परस्पर शुल्क लादण्याचा निर्णय लादण्यापूर्वी ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडाला एक महिन्याचा वेळ दिला होता. हा एक महिन्याचा कालावधी संपत आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले. त्यानंतर ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात टॅरिफबाबत चर्चा झाली. भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या उत्पादनांवरील, जसे की अमेरिकन व्हिस्कीवरील कर कमी केले होते. भारताने सुपर अमेरिकन बाईक हार्ले डेव्हिडसनवरील शुल्कही कमी केले होते. मग असे वाटले की ट्रम्पच्या कडक टॅरिफ धोरणामुळे भारताला दिलासा मिळेल. पण हे होताना दिसत नाही. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफचा मुद्दा उपस्थित केला आहे.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, आम्ही लवकरच परस्पर शुल्क आकारणार आहोत. ते आमच्याकडून शुल्क आकारतात, आम्ही त्यांच्याकडून शुल्क आकारू. मग ती कंपनी असो किंवा देश असो, जसे चीन आणि भारत. आम्हाला निष्पक्ष राहायचे आहे, म्हणून अमेरिका देखील भारत आणि चीन सारख्या इतर देशांनी अमेरिकन वस्तूंवर जे शुल्क लावले आहे तेच शुल्क लादेल. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी असेही उघड केले की त्यांना त्यांच्या पहिल्या कार्यकाळातच भारतावर परस्पर शुल्क लादायचे होते, परंतु तोपर्यंत कोरोना साथीचा रोग आला. तेव्हा आम्हाला काहीच करता आले नाही.

कोरोनापूर्वीच हा कर लादला जाणार होता.!

मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, कोरोना महामारी येण्यापूर्वी आम्ही हे करण्याची तयारी करत होतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी असेही म्हटले होते की भारतातील टॅरिफ स्ट्रक्चर सर्वात जास्त आहे आणि या देशात व्यवसाय करणे कठीण आहे. ट्रम्प तेव्हा म्हणाले होते, "पारंपारिकदृष्ट्या, भारत यादीत सर्वात वर आहे. काही छोटे देश प्रत्यक्षात जास्त कर लादतात, परंतु भारत खूप जास्त कर लादतो. मला आठवते जेव्हा हार्ले डेव्हिडसन भारतात त्यांच्या मोटारसायकली विकू शकले नाही कारण कर खूप जास्त होते, तेव्हा शुल्क खूप जास्त होते आणि हार्लेला तिथे उत्पादन करण्यास भाग पाडले गेले.

भारत अमेरिकेला कोणत्या गोष्टींची निर्यात करते?

भारत अमेरिकेला स्टील, अल्युमिनियम, औषधनिर्माण, कापड, रत्ने आणि दागिने आणि ऑटो पार्ट्स यासारख्या उत्पादनांचा मोठा निर्यातदार आहे. जर अमेरिकेने भारतातील आयातीवर जास्त शुल्क लादले तर अमेरिकन बाजारपेठेत या उत्पादनांच्या किमती वाढतील, ज्यामुळे त्यांची मागणी कमी होऊ शकते. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अमेरिका ही भारताची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ होती, जी एकूण निर्यातीपैकी सुमारे 17.7% होती. शुल्क वाढीमुळे भारतीय निर्यातीत 3.3.5% घट होण्याचा अंदाज आहे. यामुळे विशेषतः अमेरिकन बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांना नुकसान होऊ शकते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+