पाकिस्तानला थेट पाकिस्तानमध्ये जाऊन धूतलं; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा रुद्रावतार तुम्ही पाहिलाय का
SCO Summt : पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये सध्या एससीओ परिषद सुरु आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे एससीओ परिषदेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. या परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोरच जयशंकर यांनी पाकिस्तानला दहशतवादावरून सुनावलं.
सीमारेषेवर दहशतवाद्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला फटकारताना जयशंकर यांचा रुद्रावतार दिसला. पाकिस्तानने आत्मपरीक्षण करायला हवं, की दोन्ही देशांमधले संबंध का बिघडले..? एकतर्फी अजेंड्याने एससीओचा उद्देश पूर्ण होणार नाही, असं म्हणत जयशंकर यांनी चीनला टोला लगावला.

पाकिस्तानच्या थेट वर्मावरच घाव
या परिषदेत एस जयशंकर म्हणाले की, शेजाऱ्यांमध्ये मैत्री कमी का झाली, याची कारण शोधायला हवीत. एकतर शेजाऱ्याचा विश्वास नाहीय किंवा सहकार्यात कमतरता आहे. शेजारी हा शेजाऱ्यासारखं वागलं जात नसेल, तर त्याची कारण शोधायलाच हवीत. जयशंकर यांनी पाकिस्तानचं नाव न घेता स्पष्ट इशाराही दिला. ते म्हणाले, सीमेपलिकडून दहशतवादाला, फुटीरतावादाला खतपाणी घातलं गेलं तर व्यापार, उर्जेची देवाण-घेवाण आणि लोकांमध्ये संपर्क वाढणार नाही. कट्टरतावादाने कोणताही देश पुढे जात नाही. विकास आणि प्रगतीसाठी शांततेची गरज असल्याचं प्रतिपादन, एस जयशंकर यांनी केलं.
पाकिस्तानला दिला थेट इशारा
एससीओ परिषदेत भाग घेण्यासाठी जयशंकर पाकिस्तानात पोहोचले आहेत. त्यांनी त्यांच्याच देशात पाकिस्तानला थेट इशारा देत सीमेवर होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि फुटीरतावाद यामुळे व्यापार आणि संबंध वाढणार नसल्याचं म्हटलंय. भारताकडून पाकिस्तानसोबतचे संबंध हे सामान्य रहावेत, अशी इच्छा व्यक्त केली जाते पण यासाठी पाकिस्तानने दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरण तयार करणं गरजेचं आहे, असं मत जयशंकर यांनी व्यक्त केलं. जयशंकर यांनी हे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी केलं, हे विशेष.
जयशंकर यांनी चीनलाही सुनावलं
जयशंकर यांनी चीनलासुद्धा सुनावलंय. सीपीईसी प्रोजेक्टचा उल्लेख न करता जयशंकर म्हणाले की, जर आपण जगातील निवडक परंपरा विशेषत: व्यापार आणि व्यापारी मार्गांना निवडलं तर सदस्य देश प्रगती करू शकणार नाहीत. एससीओ सदस्य देशांचं सहकार्य परस्परांचा आदर आणि समानता याच्या आधारावर व्हायला हवं. त्यासाठी सर्व देशच्या अखंडता आणि स्वायत्तता याला मान्यता द्यायला हवी. यासाठी प्रत्यक्ष भागिदारी निर्माण व्हायला हवी. एकतर्फी अजेंड्यावर पुढे गेलं नाही पाहिजे.












Click it and Unblock the Notifications