जगातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीवर इराणचा ड्रोन हल्ला; क्षणभरात 'सौदी अरामको' उद्धवस्त, वाचा
Saudi Aramco refinery attack : पश्चिम आशियातील तणाव आता टोकाच्या वळणावर पोहोचला आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्षाचा भडका आता शेजारील देशांपर्यंत पसरला असून, इराणने सौदी अरेबियाची सर्वात मोठी तेल रिफायनरी 'सौदी अरामको' (Saudi Aramco) वर भीषण ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे जागतिक इंधन बाजारपेठेत खळबळ उडाली असून कच्च्या तेलाच्या किमतींवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रास तनुरा रिफायनरीला लक्ष्य: काय घडले नक्की?
आज पहाटे इराणने सौदी अरेबियातील अत्यंत महत्त्वाच्या अशा 'रास तनुरा' रिफायनरी संकुलावर ड्रोनद्वारे हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर रिफायनरी परिसरात आगीचे लोळ उठले. अरामकोने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, हा हल्ला ड्रोनच्या साहाय्याने करण्यात आला. कंपनीच्या तत्पर अग्निशमन दलामुळे आग 'मर्यादित' स्वरूपात असतानाच आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
सौदी अरामको: जगातील 'ऑईल जायंट'
जेव्हा जगात संपत्ती आणि ऊर्जेचा विषय निघतो, तेव्हा 'सौदी अरामको' हे नाव सर्वोच्च स्थानी असते. ही केवळ एक कंपनी नसून सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. अनेकदा अॅपल (Apple) आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) सारख्या दिग्गज टेक कंपन्यांना मागे टाकत ही जगातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे.
अरामकोचा ऐतिहासिक प्रवास कसा?
या कंपनीची सुरुवात १९३३ मध्ये अमेरिकन भागीदारीतून झाली होती. मात्र, १९८० पर्यंत सौदी सरकारने या कंपनीवर पूर्णपणे आपले नियंत्रण मिळवले. कंपनीचे मुख्यालय सौदीतील धाहरान येथे असून, जगभरातील सुमारे ७५,००० कर्मचारी येथे कार्यरत आहेत. अरामकोचे मार्केट कॅप अंदाजे $१.६ ते $१.७ ट्रिलियन इतके अवाढव्य आहे.
उत्पादनातील निर्विवाद वर्चस्व
अरामकोच्या ताकदीचा अंदाज त्यांच्या उत्पादनाच्या आकडेवारीवरून लावता येतो.
- दैनिक उत्पादन : ही कंपनी दररोज सरासरी १० ते १२ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन करते.
- महसूल: २०२४ मध्ये कंपनीचा वार्षिक महसूल अंदाजे $४८० अब्ज इतका होता.
- विस्तार: केवळ तेल उत्खननच नव्हे, तर रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स, वंगण (Lubricants) आणि किरकोळ विक्री क्षेत्रातही अरामकोचे साम्राज्य पसरलेले आहे.
भविष्यातील पाऊल: अपारंपारिक ऊर्जा
बदलत्या काळानुसार अरामको आता केवळ तेलावर अवलंबून न राहता नैसर्गिक वायू, एलएनजी (LNG) आणि अक्षय ऊर्जेच्या (Renewable Energy) क्षेत्रातही मोठी गुंतवणूक करत आहे. जागतिक कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या मोहिमेतही कंपनी आपले पाऊल टाकत आहे.
जागतिक परिणाम काय होणार?
सौदी अरामकोवर झालेला हा हल्ला केवळ एका कंपनीवरचा हल्ला नसून तो जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवरील (Global Supply Chain) आघात आहे. जर या हल्ल्यांमुळे उत्पादनात खंड पडला, तर भारतातही पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता अमेरिका आणि इतर पाश्चात्य देश काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
इराणमध्ये 200 लोकांचा मृत्यू, 740 जखमी
अल-जझीराच्या अहवालानुसार, अमेरिका आणि इस्रायलने एकत्र येऊन आतापर्यंत इराणच्या 1000 हून अधिक ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या दरम्यान, सुरुवातीच्या 30 तासांत 2000 हून अधिक बॉम्ब टाकण्यात आले. यामध्ये आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 740 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
एका शाळेवर क्षेपणास्त्र पडल्याने 180 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आणि 45 जखमी झाल्या आहेत. 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या लढाईच्या पहिल्या दिवशी झालेल्या बॉम्ब हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई मारले गेले होते.












Click it and Unblock the Notifications