Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारताला बांग्लादेशकडून धोका वाढला..? सिमावर्ती भागात सुरु आहे 'असं' काही...

Atrocities against Hindus in Bangladesh- बांग्लादेश अजूनही अशांत आहे. बांग्लादेश हा पाकिस्तान व चीनच्या मदतीने भारताविरोधी काहीतरी मोठा कट रचत असल्याचा दावा, काहींनी केला आहे. तेथील हिंदूंवर अपरिमित अत्याचार सुरु आहेत. तेथील कट्टरपंथिय हे हिंदूंवर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकत आहेत. आता बांग्लादेशकडून भारताच्या सिमेवर पायाभूत सुविधा वाढविल्या जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Atrocities against Hindus in Bangladesh

बांग्लादेशमध्ये कट्टरपंथियांचा हैदोस

बांगलादेशात सध्या कट्टरपंथियांचा हैदोस सुरू आहे. हिंदूंवर अत्याचार करण्यात येत आहेत. हिंदूंची घरे व दुकाने जाळण्यात येत आहेत. त्यांच्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव वाढल्याचा दावा, काही संघटना करत आहेत. तेथे सध्या कट्टरपंथियांची सत्ता असल्याने भारताविरोधात ते पाकीस्तान किंवा चिनचा आधार घेऊन काहीतरी कटकारस्थाने करतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सीमेजवळ बांग्लादेश अँक्टीव्ह

भारतीय सीमेजवळ बांगलादेशाचे सैन्य पायाभूत सुविधा वाढवत असल्याचे दिसत आहे. उत्तर बंगालमधील चिकन नेकजवळील दोन ठिकाणी एअरस्ट्रिप तयार करण्यात येत आहे. या दोन्ही एअरस्ट्रीप या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तयार करण्यात आल्या होत्या. तेव्हा हा भूभाग भारताचा होता. ठाकूर गाव आणि लाल मनीर हाट या दोन्ही ठिकाणी बांगलादेशच्या लष्कराने पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत.

तुर्कीकडून घेतले ड्रोन

या घडामोडी घडत असताना बांगलादेशाने तुर्कीकडून 10 किलर ड्रोन विकत घेतले आहे. त्यातील 6 ड्रोनची डिलिव्हरी चटगाव येथे देण्यात आली आहे. भारतीय गुप्तचर संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांना सत्तेवरून हटवल्यानंतर बांगलादेशात दहशतवाद्यांना तुरुंगातून बाहेर काढण्याचा सपाटा सुरू आहे. बांगलादेशातील कट्टरपंथी आता पाकिस्तानच्या बाजूने भारतविरोधी काम करण्याची योजना आखत आहेत. त्यासाठी पाकिस्तानकडून त्यांना रसद मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

भारतीय गुप्तचर संस्था सतर्क

भारताला बांग्लादेशकडून सध्यातरी कोणताही धोका नसल्याचे गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे. बांगलादेशमध्ये युनूस सरकार राहीले, तर तेथे कट्टरतावाद वाढेल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. सध्या बांगलादेशाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तिथे दहशतवादी आणि कट्टरतावादी सत्तेची सूत्र हाती घेण्यासाठी तयारी करत आहे. लवकरच त्यांच्याविरोधात कारवाई न केल्यास भारतासाठी ही धोक्याची मोठी घंटा असल्याचा दावा गुप्तहेर संस्थांनी केल्याचे समजते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+