Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ट्रम्प यांनी ताब्यात घेण्याची धमकी दिलेला पनामा कालवा अमेरिकेसाठी इतका महत्त्वाचा का आहे?

Donald Trump on Panama Canal Statement : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पनामा कालवा पुन्हा अमेरिकेच्या ताब्यात घेण्याची धमकी दिली. हा कालवा कॅरिबियन देश पनामाचा भाग आहे. या कालव्यावर 1999 पर्यंत अमेरिकेचे नियंत्रण होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या धकमीनंतर आता पनामा देशाचे प्रमुख व चीनने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

पनामा जास्त शुल्क आकारत असल्याचा आरोप

या कालव्याचा वापर करण्यासाठी पनामा अमेरिकेपेक्षा जास्त शुल्क आकारत असल्याचे ट्रम्प म्हणाले. चीन कालव्यावर आपला प्रभाव वाढवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यात समर्थकांच्या रॅलीला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, ते कालवा चुकीच्या हातात जाऊ देणार नाही.

रॅलीनंतर ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एआय जनरेट केलेला फोटोही पोस्ट केला. या चित्रात पनामा कालव्याच्या मध्यभागी अमेरिकेचा ध्वज लटकलेला दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये ट्रम्प यांनी 'वेलकम टू द युनायटेड स्टेट्स कॅनाल' असे लिहिले आहे. याचा अर्थ युनायटेड स्टेट्स कॅनॉलमध्ये आपले स्वागत आहे.

Donald Trump on Panama Canal Statement

पनामाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्प यांना फटकारले

पनामाचे राष्ट्राध्यक्ष जोस राऊल मुलिनो यांनी ट्रम्प यांना त्यांच्या धमकीवर जोरदार फटकारले आहे. पनामाच्या स्वातंत्र्याशी तडजोड केली जाणार नाही, असे मुलिनो यांनी रेकॉर्ड केलेल्या संदेशात म्हटले आहे. त्यांनी ट्रम्प यांचे आरोप फेटाळून लावले आणि कालव्यावरील चीनचा प्रभाव नाकारला.

मुलिनो म्हणाले की पनामा कालव्याच्या कॅरिबियन आणि पॅसिफिक बाजूंच्या दोन बंदरांचे दरवाजे सीके हचिसन होल्डिंग्सच्या उपकंपनीद्वारे व्यवस्थापित केले जातात. ही कंपनी हाँगकाँगमध्ये आहे, त्यावर चीनचे नियंत्रण नाही.

मुलिनो पुढे म्हणाले की, पनामा कालवा आणि त्याच्या सभोवतालची प्रत्येक इंच जमीन पनामाची आहे आणि भविष्यातही ती पनामाचीच राहील. मुलिनो यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले की, आम्ही यावर पुढे विचार करू.

पनामा कालवा विशेष का आहे?

पनामा कालवा उत्तर आणि दक्षिण अमेरिका दरम्यान स्थित आहे. हे दोन खंड वेगळे करण्याचे काम करते. यासह, ते अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरातील अंतर कमी करते. हा कालवा बांधण्यापूर्वी अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरून पूर्व किनाऱ्याकडे जाणाऱ्या जहाजांना हजारो नॉटिकल मैलांचा प्रवास करून केप हॉर्नमार्गे दक्षिण अमेरिकेत जावे लागत असे.

कालव्याच्या निर्मितीनंतर जहाजांचा हजारो मैलांचा प्रवास कमी झाला. पॅसिफिक महासागरातून पनामा कालव्यातून जहाजे थेट अटलांटिक महासागरात पोहोचतात. यामुळे माल वाहतूक करण्यासाठी लागणारा वेळ, इंधन आणि शिपिंग खर्च कमी होतो. पनामा जहाजांना परिवहनासाठी शुल्क आकारते. हा कालवा पनामासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे.

पनामा कालवा कसा बांधला गेला?

पनामामध्ये कालवा बांधण्याची कल्पना 16 व्या शतकाच्या सुरुवातीला आली. मात्र, 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात यासाठी प्रयत्न सुरू झाले. या काळात पनामावर कोलंबियाचे राज्य होते.

1881 मध्ये कोलंबियासह फ्रान्सने पनामा कालवा बांधण्याचे काम सुरू केले. या कामासाठी फ्रान्सने अभियंता फर्डिनांड डी लेसेप्स यांची निवड केली. त्यांनी यापूर्वी इजिप्तमध्ये सुएझ कालवा बांधला होता.

तथापि, केवळ 8 वर्षानंतर, 1889 मध्ये अभियांत्रिकी आव्हाने, कामगारांमध्ये रोगांचा प्रसार आणि निधीची कमतरता यामुळे फ्रान्सला कालव्याचे बांधकाम थांबवावे लागले.

पनामाला 1903 रोजी मिळाले स्वांतंत्र्य

पनामाला 1903 मध्ये कोलंबियापासून स्वातंत्र्य मिळाले. यानंतर 1904 मध्ये अमेरिकेने फ्रेंच मालमत्ता खरेदी करून कालवा बांधण्याची जबाबदारी घेतली. उत्तम अभियांत्रिकी वापरण्याबरोबरच अमेरिकेने रोगांवर नियंत्रण ठेवण्यावरही भर दिला. दुसरीकडे, अमेरिकन निधीचीही कमतरता नव्हती.

1914 रोजी कालव्याची झाली निर्मिती

15 ऑगस्ट 1914 रोजी कालवा अधिकृतपणे उघडण्यात आला. हे अमेरिकन अभियांत्रिकीचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते. ते बांधताना सुमारे 38 हजार अमेरिकन कामगार मरण पावले. त्यावेळी ते बनवण्यासाठी 375 दशलक्ष डॉलर्स खर्च झाले होते.

63 वर्षे या कालव्यावर होते अमेरिकेचे नियंत्रण

पुढील ६३ वर्षे या कालव्यावर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण होते. 1977 मध्ये, अमेरिका आणि पनामा यांच्यात एक करार झाला, त्यानंतर या कालव्यावर दोन्ही देशांचे संयुक्त नियंत्रण होते. त्यानंतर 31 डिसेंबर 1999 रोजी अमेरिकेने हा कालवा पूर्णपणे पनामाच्या ताब्यात दिला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+