Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पक्ष-परिवारातून हाकलल्यानंतर तेज प्रताप यादव यांचे काय होणार?, संपत्ती मिळेल का,जाणून घ्या सर्व काही

Lalu Yadav Expels Son Tej Pratap : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. त्यांना केवळ पक्षातूनच नव्हे तर कुटुंबातूनही हाकलून लावण्यात आले आहे.

तेज प्रताप यादव यांनी काल त्यांच्या नात्याची घोषणा केल्यानंतर लालू यादव यांनी हा निर्णय घेतला आहे. तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या प्रेयसी अनुष्का यादवसोबतचा फोटो शेअर केला होता आणि ते दोघेही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्याने स्पष्ट केले की त्याचे अकाउंट हॅक झाले आहे.

दरम्यान, आता थेट लालू यादव यांनी तेज प्रताप यांना पक्ष-परिवारातून काढून टाकून तेजप्रताप यांचे प्रेमसंबंध असल्याची पुष्टी केली आहे.

नेमका हाच वाद आहे का, का आणखी काही घरातील वादामुळे लालू प्रसाद यांनी हा एवढा मोठा निर्णय घेतला आहे, जाणून घ्या सर्व राजकारण, आणि तेजप्रताप यादव यांची हाकलपट्टी झाली तर त्यांचे पुढील आयुष्य कसे असणार, त्यांना संपत्ती मिळणार की नाही, त्यांची आमदारकी राहणार का, त्यांना पक्षातून तिकीट मिळणार आहे की नाही, असे सवाल देखील विचारले जात आहेत, चला तर आज या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया..!

Tej Pratap

तेज प्रताप RJDच्या चिन्हावर विधानसभा लढवू शकतील का?

तेज प्रताप यादव यांना पक्षातून व कुटुंबातून हाकलून लावल्यावर त्यांचे काय होणार, त्यांना आरजेडी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवता येणार की नाही, याचे उत्तर नाही असे आहे. कारण, त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी काढून टाकण्यात आले आहे. जोपर्यंत त्यांची हकालपट्टी मागे घेतली जात नाही किंवा रद्द केली जात नाही, तोपर्यंत ते आरजेडीच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकत नाहीत. याचा अर्थ स्पष्ट आहे की नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत तेज प्रताप यांना राजद विधानसभेचे तिकीट दिले जाणार नाही. जर तेज प्रताप यांना हवे असेल तर ते अपक्ष म्हणून किंवा स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवू शकतात.

पक्षातून काढून टाकल्यानंतर विधानसभेचे सदस्यत्व संपेल का?

तेज प्रसाद यादव यांना पक्षातून काढून टाकल्यावर त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व संपणार नाही. परंतु, त्यांना विधानसभेच्या सदस्यत्वावरून काढून टाकण्यासाठी पक्षाला विधानसभेच्या अध्यक्षांकडे अर्ज सादर करावा लागेल. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, असे त्यांना लेखी कळवावे लागेल. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष आपला निर्णय घेतील. याचा अर्थ असा की सध्या तरी तेज प्रताप यांचे विधानसभेतील सदस्यत्व अबाधित राहील. बिहार विधानसभेचा कार्यकाळ फक्त नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आहे. यानंतर, राज्यात नवीन विधानसभा असेल. त्यामुळे पक्ष त्यांच्यावर कशी कारवाई करेल, हे येत्या काळातच करेल.

तेज प्रताप यांना पालकांच्या मालमत्तेतून हक्क गमवावा लागेल का?

सध्या तरी नाही. पालकांच्या मालमत्तेतून त्यांना काढले जाऊ शकत नाही. जर लालू यादव तेज प्रताप यांना त्यांच्या मालमत्तेतून बाहेर काढायचे असतील तर त्यांना मृत्युपत्र करावे लागेल. अधिग्रहित मालमत्तेचा वारस तुम्हाला कोणालातरी बनवावा लागेल. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा करून काहीही होणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका आदेशात म्हटले आहे की, मुलगा त्याच्या वडिलांच्या मालमत्तेवर तेव्हाच हक्क मिळवू शकतो जेव्हा तो त्या मालमत्तेचा कायदेशीर वारस असेल. विशेषतः स्वतः मिळवलेल्या मालमत्तेच्या बाबतीत, वडिलांची इच्छा सर्वोच्च मानली जात असते, असाही निर्वाळा कोर्टाने एका याचिकेच्या निर्णयात दिलेला आहे.

लालूंनी तेज प्रताप यांना पक्ष-परिवारातून का काढून टाकले?

लालूं प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यांना काढून नुकसान नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण, तेज प्रताप दररोज अशा गोष्टी करायचे ज्यामुळे पक्षाचे नुकसान व्हायचे. राजद समर्थक निराश होतील. लालू यादव यांनी हा निर्णय घेऊन नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. हा फक्त एक तात्काळ निर्णय आहे. पुढे काहीही होऊ शकते. जर तेज प्रतापने माफी मागितली आणि त्याच्या पालकांकडे जाऊन विनवणी केली तर तो परत येऊ शकतो. सध्या तरी हा निर्णय पक्षाच्या हिताचा आहे, त्यामुळे आता कोणताही निर्णय व निष्कर्ष काढणे अवघड आहे.

लालूंच्या कुटुंबाचा त्यांच्या निर्णयाला पाठिंबा आहे का?

या प्रश्नाचे उत्तर सद्या तरी हो असे दिसते आहे. लालू कुटुंब हे तेज प्रताप यांच्या विरोधात एकजूट आहे. लालूंच्या निर्णयाला सर्वांनी पाठिंबा दिला आहे. लालूंचे धाकटे पुत्र तेजस्वी यादव यांनी देखील वडिलांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

तेज प्रताप यादव किती कोटींचे मालक?

जानेवारी 2024 मध्ये बिहार सरकारला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, तेज प्रताप यादव यांची एकूण मालमत्ता सुमारे 3.58 कोटी रुपये आहे. त्याच्याकडे अनेक जंगम आणि अचल मालमत्ता आहेत. या वाहनांमध्ये एक बीएमडब्ल्यू सेडान, एक स्कोडा स्लाविया (₹22 लाख) आणि एक होंडा सीबीआर 1000 आरआर सुपरबाईक (₹15.45 लाख) यांचा समावेश आहे. गोपाळगंज जिल्ह्यातील फुलवारिया आणि पटना येथेही त्यांची शेती आणि निवासी जमीन आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+